व्हाॅटस्अॅपवर येतंय 'हे' नवं फिचर, ज्यामुळे मेसेज घेता येईल मागे !

या फिचरद्वारे ५ मिनिटांच्या आत पाठवलेला मेसेज परत मिळवण्याची म्हणजेच रिकॉल करण्याची संधी आता व्हाॅट्सअॅप उपलब्ध करून देणार आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 8, 2017 09:50 PM IST

व्हाॅटस्अॅपवर येतंय 'हे' नवं फिचर, ज्यामुळे मेसेज घेता येईल मागे !

08 जून : बऱ्याच वेळा असं होतं की, आपण व्हाॅटस्अॅपवर कुणाशी तरी चॅट करत असतो आणि यात इतकं गुगं होऊन जातो की चुकून तुमच्या एखादा मॅसेज दुसऱ्या व्यक्तीला किंवा ग्रुपवर टाकला जातो. मग का झाली ना पंचाईत !, हे लक्षात आल्यानंतर साॅरी चुकून पडलं, या मॅसेजकडे इग्नोर करा अशी सारवासारव करावी लागते. पण, आता व्हाॅटस्अॅप तुम्हाला तुमची चूक सुधारण्याची नामी संधी देणार आहे.

व्हाॅट्सअॅपने अशी चुका सुधारण्यासाठी नवं फिचर लाँच करणार आहे. 'रिकॉल' असं या फिचरचं नाव असून या फिचरद्वारे ५ मिनिटांच्या आत पाठवलेला मेसेज परत मिळवण्याची म्हणजेच रिकॉल करण्याची संधी आता व्हाॅट्सअॅप उपलब्ध करून देणार आहे.

काय आहे रिकॉल फिचरमध्ये

WABetaInfo ने आपल्या ट्विटर अकाउंटद्वारे या नवीन फिचरबद्दल सांगितलंय. रिकॉल फिचरमुळे युजर्सना ५ मिनिटांचा अवधी देण्यात येईल.

Loading...

या ५ मिनिटांत आपण जे टेक्स्ट, फोटो,व्हिडिओ, GIFs, डॉक्युमेंट्स

पाठवले असतील ते परत मागे घेऊ शकणार.

एवढंच नाहीतर स्टेटस रिप्लाय सुद्धा पुन्हा मिळवू शकतो. रिकॉल हा फिचरचा जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला व्हाट्सअॅपच्या 2.17.30व्हर्जन अपडेट करावे लागणार आहे. त्यामुळे व्हाॅटस्अॅपचं हे फिचर नक्कीच सगळ्याचं फायद्याचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 8, 2017 09:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...