नव्या वर्षी 'या' मोबाईलमध्ये होणार व्हाॅट्सअॅप बंद!

नव्या वर्षी 'या' मोबाईलमध्ये होणार व्हाॅट्सअॅप बंद!

३१ डिसेंबरनंतर व्हॉट्सअॅप काही फोनवर काम करणं बंद करणाराय. आऊटडेटेज व्हर्जनला व्हॉट्सअॅप सपोर्ट करणार नाही, असं कंपनीकडून सांगण्यात आलंय.

  • Share this:

26 डिसेंबर : व्हॉट्सअॅप आज आपल्या आयुष्यातील एक भाग झालाय.सकाळी उठल्या उठल्या आपण सगळेच पहिलं दर्शन घेतो ते व्हाॅटसअपचं. व्हाॅट्सअॅप थोड्या वेळ बंद पडलं, तरी राहवत नाही. पण आता कदाचित तुमच्या फोनवरचं व्हाॅट्सअप बंद कायमचं बंद पडू शकतं.

ही बातमी व्हॉट्सअॅपशिवाय न जगू शकणाऱ्यांसाठी महत्त्वाची आहे. ३१ डिसेंबरनंतर व्हॉट्सअॅप काही फोनवर काम करणं बंद करणाराय. आऊटडेटेज व्हर्जनला व्हॉट्सअॅप सपोर्ट करणार नाही, असं कंपनीकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे 31 डिसेंबरनंतर म्हणजे नव्या वर्षात व्हॉट्सअॅप वापरायचं असेल, तर कंपनीने लिस्ट केलेले फोन बदलावे लागणार आहेत.

कुठल्या फोनवर बंद होणार व्हॉट्सअॅप?

- नोकिया सिम्बियन S60

- ब्लॅकबेरी ओएस आणि ब्लॅकबेरी 10

- विंडोज फोन 8.0 आणि यापेक्षा जुने व्हर्जन्स

- नोकिया S40

- अँड्रॉईड 2.3.7 आणि यापेक्षा जुने व्हर्जन्स

आता तुम्ही लगेच तुमचा फोन कुठला आहे ते तपासा, आणि नव्या वर्षी फोनची खरेदी करून टाका.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 26, 2017 01:39 PM IST

ताज्या बातम्या