जीवघेण्या 'ब्लू व्हेल गेम' बद्दल हे जाणून घ्या, आणि सावध व्हा !

या गेममध्ये टास्कची सिरीज असते. हे टास्क 50 दिवसांत पूर्ण करायचे असतात. 'अ साइलेंट हाऊस', 'अ सी ऑफ व्हेल्स' आणि 'वेक अप मी एट 4.20 ए एम' असे या टास्कची नावं असतात आणि शेवटी जो मृत्यूला कवटाळतो तोच जिंकतो.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 1, 2017 09:55 PM IST

जीवघेण्या 'ब्लू व्हेल गेम' बद्दल हे जाणून घ्या, आणि सावध व्हा !

01 आॅगस्ट : जगभरात 'ब्लू व्हेल' या गेमने खळबळ माजवली आहे. जगभरातील अनेक किशोर वयातील मुलांचा या गेमने जीव घेतला आहे 2015 -2016 या एका वर्षातच 130 मुलांनी आत्महत्या केली. या खेळात शेवटी जो मृत्यूला कवटाळतो तो विजयी होतो.

भारतासाठी धोक्याची घंटा

आता भारतातल्या मुंबईतही एका 14 वर्षांच्या मुलानं याच 'ब्लू व्हेल चॅलेन्ज' गेममुळे आत्महत्या केल्याचं समोर आलंय. ब्लू व्हेल चॅलेन्ज या गेममुळे झालेली भारतातील पहिली आत्महत्या आहे. ही आत्महत्या त्यानं ब्लू व्हेल गेमच्या पन्नासाव्या टास्कमुळे केल्याचं त्याच्या मित्रांनी सांगितलं. त्याने आत्महत्या करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा  गुगलवर शोधही घेतला होता. त्याला रशियाला जाऊन सिक्रेट ग्रुप सोबत हा खेळ खेळण्याचीही इच्छा होती. मरणाच्या आधी त्यानं एक फोटो शेअर केला होता ज्यामध्ये त्याचे पाय दिसत होते आणि सोबत लिहिलं होतं की आता तुमच्यासोबत फक्त हा फोटोच राहील.

ब्लू व्हेल गेम कसा झाला सुरू ?

ब्लू व्हेल चॅलेंज हा गेम जगभर पसरलाय आणि आतापर्यंत 19 देशात 200 मुलांचे जीव या देशाने घेतले आहेत. यातले 130 मृत्यू रशियातच झाले आहेत. अमेरिका आणि आफ्रिकेतही अनेकांचे जीव गेले आहेत. द ब्लू व्हेल गेम'ला 25 वर्षांच्या के. फिलीप बुडेकिन या तरुणाने 2013 साली बनवला होता. रशियामध्ये 2015 साली या गेमने पहिला बळी घेतला होता. त्यानंतर फिलीपला तुरूंगवास ठोठावण्यात आला होता. फिलीपच्या मते हा गेम समाजातील बायोलॉजिकल कचऱ्याच्या साफसफाईसाठी आहे. जे लोकं आत्महत्या करतात ते बायॉलोजिकल वेस्ट असतात असं फिलीपचं म्हणणं आहे.

Loading...

हा गेम  नक्की काय आहे ?

हा गेम किशोरांना टास्क पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त करतो. या गेममध्ये टास्कची सिरीज असते. हे टास्क 50 दिवसांत पूर्ण करायचे असतात. 'अ साइलेंट हाऊस', 'अ सी ऑफ व्हेल्स' आणि 'वेक अप मी एट 4.20 ए एम' असे या टास्कची नावं असतात आणि शेवटी जो मृत्यूला कवटाळतो तोच जिंकतो.

गेमची सुरूवात

हा गेम व्हीकोन्टाक्टे नावाच्या रशियन साईटवर खेळला जातो. रशियानंतर या गेमने भारत अमेरिका आणि युरोपला टार्गेट केलं होतं. या गेमचे सूत्रधार डेथ आणि सुसाईड ग्रुप्सच्या माध्यमातून या मुलांना शोधतात. रशियातले असे अनेक ग्रुप्स सरकारने बंद केले आहेत. पण एक डिलीट केल्यावर लगेच दुसरा ग्रुप तयार केला जातो. तसंच आपण टास्क पूर्ण केलंय हे दाखवायला फोटो ही पाठवावे लागतात.

इन्स्टाग्रामने या गेम विरूद्ध पाऊलं उचलली

दोन रशियन मुलांनी इन्स्टाग्रामवर या गेमचे फोटो पोस्ट केल्यानंतर हा गेम बातम्यांमध्ये आला होता. त्यामुळे इन्स्टाग्रामने या गेम विरूद्ध पाऊलं उचलली आहेत. आता या गेमचे फोटो टाकत असल्यास इन्स्टाग्रामवर वॉर्निंगही येते.

या गेमच्या विळख्यात कोण येऊ शकतं ?

जे सोशल मीडिया आणि स्मार्टफोनचा प्रचंड वापर करतात

जे इंटरनेट गेमिंग अॅडिक्ट आहेत. हा गेम खेळू लागल्यानंतर माणूस चिडचिडा आणि उदास होतो. जर मुलात ही परिवर्तन दिसत असतील तर ते ब्लू व्हेल गेम खेळत असू शकतात.

या गेमवर उपाय काय?

- मानसशास्त्रज्ञाकडे नेऊन सामान्य परिस्थितीत आणा

- मुलासोबत घट्ट नातं बनवा

- मुलाला खेळापासून एकदम तोडू नका तर हळूहळू तोडा

- पहिले दिवसातले गेम खेळण्याचे तास कमी केले जातात

- त्यानंतर गेम खेळण्याची सवय आठवड्यातून एकदा खेळण्यापर्यंत आणली जाते आणि अखेर ही सवय मोडली जाते

मुलं इंटरनेट गेम का खेळतात

- एकटेपणा दूर करण्यासाठी मुलं हा खेळ खेळतात

- काल्पनिक कथांचा भाग बनण्यासाठी मुलं हा खेळ खेळतात

     

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2017 09:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...