S M L

बजेटमध्ये मिळतोय विवोचा नवा स्मार्टफोन

विवोने आपला नवीन स्मार्टफोन Vivo V9 Youth भारतामध्ये लॉंच केला आहे. याचा फुल व्ह्यू डिस्प्ले आहे. या मोबाईलची किंमत भारतामध्ये १८,९९० रुपये असणार आहे.

Sonali Deshpande | Updated On: Apr 25, 2018 04:34 PM IST

बजेटमध्ये मिळतोय विवोचा नवा स्मार्टफोन

21 एप्रिल : विवोने आपला नवीन स्मार्टफोन Vivo V9 Youth  भारतामध्ये लॉंच केला आहे. याचा फुल व्ह्यू डिस्प्ले आहे. या मोबाईलची  किंमत भारतामध्ये १८,९९० रुपये असणार आहे. तसेच हा फोन ब्लॅक आणि गोल्ड रंगामध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे.

विवोच्या या नवीन फोनचा डिस्प्ले ६.३ इंच फुल HD (1080x2280 पिक्सल) डिस्प्ले आहे. आणि याचा अस्पेक्ट रेशो 19:९ आहे. यामध्ये ४ जीबी रॅम व ३२ जीबी इंटर्नल स्टोरेज असेल, ज्याला २५६ जीबीपर्यन्त वाढवता येऊ शकते.  आणि यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 प्रोसेसर आहे .एंड्रॉयड 8.1 ओरियो बेस्ड फनटच OS 4.0 वर हा काम करतो.

याचा समोरील कॅमेरा हा १६ मेगा पिक्सेलचा आहे. सोबतच यामध्ये AI फेस ब्युटी फीचर आहे. सेल्फी  शौकीन असणाऱ्यांना याचा चांगल्या प्रकारे उपयोग होणार आहे. याचा सेकंडरी कॅमेरा २ मेगा पिक्सेलचा आहे. यामध्ये विशेष बोकेह इफेक्ट आहे .पाॅवरसाठी यामध्ये  3260 mAhची बॅटरी दिलेली आहे. या फोनचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे  बाकीच्या फीचरसाठी यामध्ये फिंगरप्रिंट सेंसर दिलेले आहे. हा फोन भारतीय ग्राहक येत्या २४ एप्रिलपासून फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि पेटियमवर खरेदी करू शकतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 21, 2018 03:14 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close