S M L

आता मुंबई-पुणे प्रवास करा अवघ्या 20 मिनिटांत, येतंय हायपरलूप तंत्रज्ञान

वाहतुकीसाठी हायपर लूप तंत्रज्ञान आणलं जाणार आहे.हायपर लूप वन आणि राज्य सरकारमध्ये यासंदर्भात करार झाला आहे. याचा पहिला प्रयोग मुंबई पुण्यादरम्यान करण्यात येणार आहे.

Sonali Deshpande | Updated On: Nov 17, 2017 03:17 PM IST

आता मुंबई-पुणे प्रवास करा अवघ्या 20 मिनिटांत, येतंय हायपरलूप तंत्रज्ञान

17 नोव्हेंबर : बुलेट ट्रेननंतर आता भारतात प्रवासासाठी आणखी एक वेगवान तंत्रज्ञान येणार आहे.  हे तंत्रज्ञान आहे हायपरलूप टेक्नॉलॉजी. त्यामुळे  मुंबई-पुणे प्रवास फक्त 20 मिनिटांत पार करणं शक्य होणार आहे. वाहतुकीसाठी हायपर लूप तंत्रज्ञान आणलं जाणार आहे.

हायपर लूप वन आणि राज्य सरकारमध्ये यासंदर्भात करार झाला आहे. याचा पहिला प्रयोग मुंबई पुण्यादरम्यान करण्यात येणार आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे हा सर्वात व्यस्त मार्ग आहे. त्यात पावसाळ्यात भीती असते ती दरडी कोसळण्याची. ही दोनही शहरे व्यापारी दृष्ट्याही महत्त्वाची असल्यानं ट्रॅफीक जॅम परवडणारं नसतं त्यामुळं हे नवीन तंत्रज्ञान उपयोगी ठरणारं आहे. पण प्रत्यक्षात येण्यासाठी याला किती कालावधी लागेल हे अजून निश्चित नाही.

हायपरलूप तंत्रज्ञान म्हणजे काय?

- हवेच्या पोकळीतून स्पीडब्रेकरशिवाय ट्रेन-मेट्रोसदृश वाहनातून प्रवास

- त्यासाठी विशिष्ट आकाराच्या आणि विशिष्ट स्वरूपाच्या ट्युबची निर्मिती

Loading...

- वाहनाचे डबे हे कॅप्सूलच्या स्वरूपाचे

- डबे चुंबकीय तंत्रज्ञान असलेल्या रुळांवरून धावतात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 17, 2017 03:17 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close