उबर आणणार उडणाऱ्या टॅक्सी, नासासोबत केला करार

उबर आणणार उडणाऱ्या टॅक्सी, नासासोबत केला करार

अंतराळ कायद्याअंतर्गत उबरने नासासोबत करार केला आहे. शहरी हवाई वाहतूक सेवा देण्याचे मॉडेल यामध्ये तयार केले जाणार आहे.

  • Share this:

11 मे : अंतराळ कायद्याअंतर्गत उबरने नासासोबत करार केला आहे. शहरी हवाई वाहतूक सेवा देण्याचे मॉडेल यामध्ये तयार केले जाणार आहे. अवघ्या काही वर्षात प्रसिद्ध झालेली ही कंपनी आपल्या उडणाऱ्या टॅक्सी बाजारात आणणार आहे.

आता या टॅक्सीमध्ये उडण्याचे विशेष तंत्रज्ञान वापरण्यात आल्याने त्याचा दर जास्त असेल असे आपल्याला साहजिकच वाटून जाते. मात्र हा दर सामान्य टॅक्सी इतकाच ठेवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे या अनोख्या सेवेसाठी तुम्हाला जास्तीचे पैसे मोजण्याची आवश्यकता नसेल असे कंपनीचं म्हणणं आहे.

अंतराळ कायद्याअंतर्गत उबरने नासासोबत करार केला आहे. शहरी हवाई वाहतूक सेवा देण्याचे मॉडेल यामध्ये तयार केले जाणार आहे. याबाबतीत उबरने सरकारी यंत्रणेसोबतही काम केले आहे. 'उबर एअर' पायलट योजनेत लॉस एंजिलसदेखील भागीदार असणार आहे.

याआधी डलास फोर्ट-वर्थ, टेक्सास आणि दुबई देखील यात सहभागी झाले आहेत. २०२० पर्यंत अमेरिकेतील काही शहरांत उबर हवाई विमान सेवा प्रायोगिक तत्वावर सुरू करणार आहे. शहरी भागात हवाई टॅक्सी संदर्भातील संशोधन, प्रगती आणि चाचणीसंदर्भातील आव्हानांवर काम केल जात असल्याचे नासाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 11, 2018 08:46 AM IST

ताज्या बातम्या