S M L

ट्विटरच्या 'या' निर्णयामुळे मोदींपासून ते बराक ओबामापर्यंत सगळ्याचे फॉलोअर्स झाले कमी

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विटरवरील जवळपास 3 लाख फॉलोअर्स कमी झाले आहेत.

Updated On: Jul 14, 2018 09:32 AM IST

ट्विटरच्या 'या' निर्णयामुळे मोदींपासून ते बराक ओबामापर्यंत सगळ्याचे फॉलोअर्स झाले कमी

मुंबई, 14 जुलै : ट्विटरवर सक्रिय नसलेले अकाऊंट्स बंद करण्याचा निर्णय ट्विटरने घेतला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विटरवरील जवळपास 3 लाख फॉलोअर्स कमी झाले आहेत. विशेष म्हणजे केवळ तीन तासांत मोदींच्या फॉलोअर्समध्ये ही लक्षणीय घट झाली आहे.

तुमच्या अकाऊंटला फोलो करणाऱ्यापैकी फेक अकाऊंटची खात्री करुनच त्यांना कमी करण्यात आले आहे. त्यामुळे तुमचे अकाऊंट पारदर्शी आणि अर्थपूर्ण होईल, असे ट्विटरने म्हटले आहे. 'स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत मोदींचे फॉलोअर्स कमी झाल्याची टीका एका ट्विटर युजरने केली आहे.

आंबे वक्तव्य भोवलं, संभाजी भिडे दोषी !

@narendramodi नावाने मोदींचे ट्विटर अकाऊंट असून देशातील सर्वाधिक ट्विटर फॉलोअर्सपैकी हे एक आहे. तसंच पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटच्या फॉलोअर्सची संख्याही एक लाख 40 हजारांनी कमी झाली आहे. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे 17 हजार ट्विटर फॉलोअर्स कमी झाले. तर बिग बी अमिताभ बच्चन यांच्याही ट्विटर फॉलोअर्सची संख्या जवळपास 4 लाखांनी कमी झाली आहे.

दरम्यान, 'सक्रिय नसलेली अकाऊंट्स बंद केली जातील, आमच्या या निर्णयामुळे काही दिवस अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पण आम्ही पारदर्शितेवर विश्वास ठेवतो, ज्यातून ट्विटर ही अधिक संवादभिमुख सेवा होऊ शकेल,' असं ट्विटरचे सुरक्षा प्रमुख विजय गडे यांनी म्हटलं आहे. या निर्णयामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही बसला आहे. ट्रम्प यांचे 1 लाख फॉलोअर्स कमी झाले. तर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचेही 4 लाख फॉलोअर्स घटले आहेत.

Loading...
Loading...

हेही वाचा...

उल्हासनगर,अंबरनाथचा परिसरही भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला

भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला कल्याण डोंबिवलीचा परिसर !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 14, 2018 09:31 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close