तुमचा स्मार्टफोन हरवला तर काय कराल?

तुमचा स्मार्टफोन हरवला तर काय कराल?

फोन हरवल्यावर त्यात असणारा डाटा किंवा बॅक आणि सोशल मीडियाची माहिती लिक होण्याची भीती असते. या सगळ्या अडचणींपासून वाचण्यासाठी सगळ्यात आधी हे काम करा.

  • Share this:

स्नेहल पाटकर, 10 आॅगस्ट : सध्या स्मार्टफोन म्हणजे सगळं काही,  त्यामुळे तो जर चोरीला गेला किंवा हरवला तर खूप अडचणी निर्माण होऊ शकतात. फोन हरवल्यावर त्यात असणारा डाटा किंवा बॅक आणि सोशल मीडियाची माहिती लिक होण्याची भीती असते. या सगळ्या अडचणींपासून वाचण्यासाठी सगळ्यात आधी हे काम करा.

लोकेशन ट्रेस करा - आता जवळपास सगळ्याच स्मार्टफोन मधे इन्बिल्ट लोकेशन ट्रॅकिंग सिस्टिम असते. फोन हरवला तर गुगल अकाउंटवरुन तुम्ही तुमच्या पीसीवर साईनइन करुन फोनच्या लोकेशन ट्रेस करु शकता..जोपर्यंत फोन ऑफ नसेल तोपर्यंत तुम्हाला फोनचं लोकेशन काय आहे याची माहिती मिळू शकते.

सोशल साईटसचा पासवर्ड बदला- फोन चोरी होणं किंवा हरवल्यावर जितकं लवकर शक्य होईल तितकं आपल्या सोशल साईटस् जसं की, फेसबुक ,ट्विटर, इंस्टाग्रामचा पासवर्ड बदला.ज्यामुळे कोणीही तुमच्या नावाचा बनलेला सोशल आयडीचा गैरवापर करू शकणार नाही.

आपल्या डाटाचा बॅकअप घ्या- सगळ्यांनाचा आपापल्या फोनमधे असलेले कॉन्टॅक्ट, फोटो आणि विडीयो कधीच हरवू नयेत अस वाटतं. त्यामुळे आपल्या फोनवरचा सगळ्या महत्त्वपूर्ण डाटाचा बॅकअप घेऊन ठेवा. त्यानंतर जेव्हा केव्हा तुमचा फोन हरवतो किंवा चोरीला जातो, तेव्हा तुम्हाला तुमचा डाटा बॅकअपचा उपयोग होऊ शकतो.

लॉक स्क्रिनवर तुमची माहिती- तुम्ही तुमचा मोबाईलच्या लॉकस्क्रिनवर ईमेलआयडी किंवा इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर माहिसाठी ठेऊ शकता.हे कधी कधी महत्त्वाचं असू शकतं कारण तुमचा फोन हरवल्यावर फोन शोधणारा या स्क्रिनवरच्या माहितीवरून तुमच्याशी संपर्क करू शकतो.

सीमकार्ड बंद करा- जेव्हा तुम्हाला कळेल तुमचा फोन तुमच्या जवळ नाहीए हरवलाय किंवा चोरीला गेलाय. तेव्हा लगेचच तुमच्या सेल्युलर ऑपरेटरशी बोलून घ्या.ऑपरेटरशी बोलून सगळ्यात आधी तुमचं सीमकार्ड बंद करा, ज्यामुळे तुमच्या फोनचा कोणी गैरवापर करणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 10, 2017 11:54 AM IST

ताज्या बातम्या