S M L

'आयफोन एक्स ले जायेंगे',नवरदेवाच्या थाटात पठ्याने गाठलं मोबाईल स्टोर !

आयफोन एक्स घेण्यासाठी चक्क घोड्यावरून बसून वाजत गाजत एक पठ्या मोबाईल घेण्यासाठी रवाना झाला.

Sachin Salve | Updated On: Nov 3, 2017 11:06 PM IST

'आयफोन एक्स ले जायेंगे',नवरदेवाच्या थाटात पठ्याने गाठलं मोबाईल स्टोर !

03 नोव्हेंबर : आयफोनवर प्रेम करण्याची काही कमी नाही. त्याचंच एक उदाहरण ठाण्यात पाहायला मिळालाय. आयफोन एक्स घेण्यासाठी चक्क घोड्यावरून बसून वाजत गाजत एक पठ्या मोबाईल घेण्यासाठी रवाना झाला आणि आयफोन एक्स विकत घेतला.

लग्नामध्ये नवरा नवरीच्या मंडपात जाण्यासाठी घोड्यावर बसून वाजत गाजत जातो. असाच प्रकार एका मोबाईल प्रेमीने ठाण्यात केलाय. आज संध्याकाळी 6 वाजता आयफोन 7 एक्स् हा एक लाख रूपयाचा मोबाईल उपलब्ध झालाय. गेल्या अनेक दिवसांपासून या फोनची आयफोन प्रेमी वाट पाहून होते.

अखेर आज हा फोन उपलब्ध झाल्यामुळे ठाण्यातील महेश पलावील या आयफोन वेड्याने अगदी नवरदेवाच्या थाटात घोड्यावर बसून वाजत गाजत मोबाईल स्टोर गाठले. विशेष म्हणजे त्याच्या मित्रांनी आय लव्ह आयफोन एक्स असे बॅनर घेऊन वाजत गाजत वरातीत सहभागी झाले. 

Loading...
Loading...

विशेष म्हणजे महेश हा पहिला 'कस्टमर' ठरला. त्यामुळे त्याने हा क्षण चक्क घोड्यावर बसून बँडबाजासह नौपाडा येथील श्री जी मोबाईल शॉपी गाठली. शाॅप मालकाने ही महेशला दुकानाबाहेर येऊन थेट घोड्यावरच असताना मोबाईल स्वाधीन केला. त्यामुळे म्हणतात ना हौसेला मौल नाही ते असंच काही असतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 3, 2017 08:24 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close