S M L

#फ्लॅशबॅक2017 : 'सोशल मीडिया'चाच बोलबाला

२०१७ मध्ये भारत जगातला सगळ्यात जास्त डेटा वापरणारा देश ठरला आहे. लवकरच आपल्या देशात फाईव्ह जी सुरू होणार असल्याचीही चर्चा आहे.

Sonali Deshpande | Updated On: Dec 31, 2017 02:09 PM IST

#फ्लॅशबॅक2017 : 'सोशल मीडिया'चाच बोलबाला

सचिन साळवे, 31 डिसेंबर : २०१७ मध्ये भारत जगातला सगळ्यात जास्त डेटा वापरणारा देश ठरला आहे. लवकरच आपल्या देशात फाईव्ह जी सुरू होणार असल्याचीही चर्चा आहे.. पण गेल्या वर्षभरात सोशल मीडियात अनेक बदल झाले काही छोटे होते तर काही खूपच मोठे. सोशल मीडियाच्या फायद्या-तोट्याचीही मोठी चर्चा झाली.

भारतात जवळपास 35.5 कोटी इंटरनेट युजर्स

सोशल मीडिया आणि मोबाईल एक नाजूक नातं. म्हणूनच २०१४-२०१६ या दोन वर्षांत 150 अब्ज तास मोबाईलवर इंटरनेटचा वापर झालाय. एवढंच नाहीतर लोकं टीव्ही कमी पण मोबाईलमध्ये जास्त गुंतलेले असतात असं 'इंडिया इंटरनेट ट्रेन्डस 2017' हा रिपोर्टमध्ये समोर आलंय. या रिपोर्टनुसार, भारतीय एका आठवड्यात फक्त चारच तास टीव्ही बघतात. मात्र हेच भारतीय एका आठवड्यात २८ तास मोबाईलचा वापर चॅटिंग,कॉलिंग आणि सर्फिंगसाठी करतात.भारतात जवळपास 35.5 कोटी इंटरनेट युजर्स असल्याचा दावा हा रिपोर्ट करतो. या युजर्सची संख्या 28 टक्क्यांनी दर वर्षी वाढते आहे. हे युजर्स डेटा वापरातील 45 टक्के वेळ मनोरंजनासाठी तर 34 टक्के वेळ सोशल मीडिया,सर्चिंग आणि इतर गोष्टींसाठी वापरतात.सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे भारतातील अॅण्ड्रॉइड युजर्सनी २०१४-२०१६ या दोन वर्षात 150 अब्ज तास इंटरनेटचा वापर केला. एवढंच नाही तर ब्रॉडबॅण्डच्या वापर ही लक्षणीय वाढलाय.भारतातील 22.७ कोटी लोक आज ब्रॉडबॅण्ड युजर्स झालेत.

2021मध्ये इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या होणार 82.9 कोटी

आपण सहज म्हणतो इंटरनेटवर टाइमपास करतोय. पण याच इंटरनेटवर टाइमपास करणाऱ्यांची संख्या 45 कोटींपेक्षाही जास्त वाढलीये. 1969 मध्ये इंटरनेटचा शुभारंभ झाल्याच्या 26 वर्षानंतर 15 ऑगस्ट 1995 रोजी भारतात इंटरनेट सुरू झालं. विदेशी कम्युनिकेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने त्यांच्या भारतीय दूरध्वनी यंत्राद्वारे जगातील संगणकांना भारतीय संगणकांशी जोडून इंटरनेटची सुरुवात केली.

Loading...
Loading...

इंटरनेट सुरू झाल्यानंतर तीन वर्षांनी, 1998मध्ये खाजगी कंपन्यांनी इंटरनेट सर्व्हिस सेक्टरमध्ये प्रवेश केला आणि कदाचित त्याचमुळे सध्या भारतातील इंटरनेट युजर्सची संख्या 45 कोटींपेक्षा जास्त आहे.भारत पुढील तीन वर्षांत डिजिटायझेशन आणि इंटरनेट ग्राहकांची संख्या वेगाने वाढत आहे. म्हणजे 2021मध्ये ही संख्या 82.9 कोटी होईल असा अंदाज नाकारता येत नाही.

सोशल मीडिया झाले अप टू डेट !

यंदाच्या वर्षी सोशल मीडियावर मोठे बदल झाले. लोकं फेसबुकवर लाईव्ह व्हिडिओ करताय. टेक्स्टसह इमेज शेअर करता येत आहे. एवढंच काय तर आता फेसबुकवर एखादी वस्तूही विकता येणार आहे. विशेष म्हणजे फेसबुकच्या युजर्सची संख्या तब्बल 200 कोटींवर पोहोचली. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या एक चतुर्थांश एवढी ही संख्या मानली जातेय.

27 जून 2017 सकाळपर्यंत फेसबुकने अधिकृतपणे 200 कोटी लोकांचा टप्पा गाठला   फेसबुक युजर्सची संख्या 100 कोटींवरून 200 कोटींवर पोहोचण्यास 5 वर्षे लागलीत. ऑक्टोबर 2012 मध्ये फेसबुकने 100 कोटी युजर्सचा टप्पा गाठला होता, तीच संख्या अवघ्या पाच वर्षांमध्ये दुप्पट म्हणजेच 200 कोटी बनलीय.

टि्वट आता 280 शब्दात

टि्वटरही यात मागे नाही. टि्वटरने वर्षा अखेरीस सर्वात मोठा दिलासा दिला तो शब्द मर्यादेचा. टि्वटरने आपली शब्द मर्यादा 140 वरून 280 केली. त्यामुळे मोठी वाक्य लिहणाऱ्यांची मोठी सोय झालीत.

ट्विटरने डिलिट केले 90 हजार 'फेक' अकाऊंट

ट्विटरवर हल्ली अश्लील कंटेट खूप मोठ्या प्रमाणात जनरेट केला जातो. या कंटेंटला चाप बसवायचा विडा ट्विटरने उचलला. हा सगळा कंटेंट फेक अकाऊंट्सवरून जनरेट होतो. त्यातले बरेचसे फेक अकाऊंट्स मुलींच्या नावावर आहेत, आश्चर्याची बाब म्हणजे या अकाऊंटसला आणि कंटेंटला 3 कोटीहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्यामुळेच ट्विटरने नुकतेच 90,000 अकाऊंट डिलिट केले आहेत.

स्काइपमध्ये तब्बल ६ वर्षांनंतर अपडेट

तर माइक्रोसॉफ्ट कंपनीने त्यांच्या  स्काइपमध्ये तब्बल ६ वर्षांनंतर पहिल्यांदाच बदल केले. या नवीन skype च्या  अपडेटमध्ये इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅटसारख्या अॅपमधील बघायला मिळतील.  कंपनीने "Find", "Chat", आणि "Capture" यासारख्या ३ नवीन विंडोज आणल्या आहेत. "Find" च्या फिचर्समध्ये हवामान, पोल, GIF, शो तिकीट यासारखे ऑप्शन देऊन युजर्स आपल्या मोबाईलच्या कॉनटॅक्ट मधून शेअर करू शकतात.

व्हाॅट्सअॅप अॅपचा राजा !

सर्वांच्या लाडाचे अॅप म्हणजे व्हाॅटस्अॅप. सोप आणि दैनदिन जिवनातले अविभाज्य घटक. म्हणूनच व्हाॅट्सअॅपने वेळोवेळी मोठे बदल करून सर्व वापरकर्त्यांना कधी नाराज केलं नाही. व्हाईस काॅल, व्हिडिओ काॅल सुविधा देऊन व्हाॅटस्अॅपने एक पाऊल पुढे टाकले. ग्रुपमध्येही व्हिडिओ आणि आॅडिओ काॅलची सुविधा उपलब्ध करून दिली. तसंच  चुकून गेलेला एखादा मेसेज,फोटो,व्हिडिओ वापस म्हणजे डिलिट करण्याचं नवीन फिचर देण्यात आला आहे.

चोवीस तासांपेक्षा जास्त वेळ राहणार इन्स्टाग्राम स्टोरीज

सेलिब्रिटींच्या लाडाचं इन्स्टाग्रामही यात मागे राहिलं नाही.  आत्तापर्यंत इन्स्टाग्राम किंवा फेसबुकवर पोस्ट केल्या जाणाऱ्या स्टोरीज‌नां चोवीस तासांची मर्यादा होती, पण आता इन्स्टाग्रामच्या लेटेस्ट अपडेटनंतर पोस्ट केल्या जाणाऱ्या स्टोरीज या वेगळ्या प्राइव्हेट स्पेसमध्ये सेव्ह होणार आहेत.

स्नॅपचॅटचे सीईओच्या सीईओची भारतात सोशल मीडियावर धुलाई

स्नॅपचॅटचे सीईओ इवान स्पीगलनं भारत खूप गरीब देश आहे आणि आमचं अॅप केवळ श्रीमंत देशांसाठी बनवण्यात आलं आहे, असं वादग्रस्त विधान केलं होतं. पण त्याचे परिणाम स्नॅपचॅटला आज भोगावे लागत आहेत.भारतीयांनी सोशल मीडियावरुन स्नॅपचॅटच्या सीईओंच्या वक्तव्याचा निषेध करुन, आपल्या मोबाईलवरुन हे अॅप अनइन्स्टॉल करत असल्याचं जाहीर केलं. एवढंच काय गुगल प्ले स्टोअरवर पूर्वी स्नॅपचॅटला पाच स्टारचं रेटिंग मिळत होतं. पण आता त्यात घसरण होऊन एकवर पोहोचलं. तर अॅन्ड्रॉईड प्ले स्टोअरसवरही स्नॅपचॅटच्या रेटिंगमध्ये घसरण झाल्याचं चित्र आहे. तर ट्विटरवरुनही स्नॅपचॅटविरोधात भारतीय नेटिझननी ट्विटरवर  #boycottsnapchat ही मोहिम राबवली होती.

'रॅनसमवेअर'चे वादळ

या वर्षात रॅनसमवेअर व्हायरसने भल्याभल्याना धडकी भरवली.भारतातील सर्वात मोठं बंदर असलेल्या जेएनपीटीला रॅनसमवेअर व्हायरसचा फटका बसलाय. रॅनसमवेअर व्हायरसच्या अॅटॅकमुळे जेएनपीटी बंदराची कार्यप्रणाली ठप्प झाली होती.

तसंच युके, रशिया, फ्रान्स, स्पेनमध्ये या व्हायरसनं ग्राहक, मालवाहतूक, हवाई वाहतूक सेवा, तेल कंपन्यांवर हल्ला केला होता. भारताला या हल्ल्याची झळ बसली. हा व्हायरस 'पीटा' नावाच्या जुन्या रॅन्समवेअरचं अॅडव्हान्स्ड वर्जन होतं. पेट्यानं 20 प्रसिद्ध कंपन्यांमधील कम्प्युटर हॅक केले आणि कम्प्युटर अनलॉक करण्याच्या मोबदल्यात हॅकर्संनी 300 डॉलरची मागणी केली होती.

'रॅन्समवेअर' म्हणजे नेमकं काय ?

तुम्ही तुमचा संगणक किंवा लॅपटॉप सुरू केल्यानंतर त्यावर एक मेसेज येतो की, तुमचा संगणक आम्ही हॅक केला असून तुमचा संपूर्ण डेटा तुम्हाला हवा असल्यास स्क्रीनवर दिसत असलेल्या पेमेंट ऑप्शनला क्लिक करून खंडणीची रक्कम या बँक खात्यात भरा अन्यथा तुमचा सर्व डेटा डिलीट होईल. थोडक्यात सांगायचं तर तुमच्या पीसीचा ताबा हा आता हॅकर्सने घेतलेला असतो. कारण तुमची ऑपरेटिंग सिस्टमच सुरू होत नाही. अशा प्रकारच्या सायबर गुन्हेगारीला रॅन्समवेअर असे म्हणतात.

सोशल मीडियावर गुरमेहर कौरचं आंदोलन गाजलं

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ या ना त्या घटनांमुळे चर्चेत राहिला.  गुरमेहर कौर या विद्यार्थिनीने एक ट्विट केलं. 'मी दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे, मी अभाविपला घाबरत नाही आणि मी एकटी नाही. अवघा देश माझ्यासोबत आहे' असं ट्विट तिने केलं होतं. पण तिच्या या पोस्टनंतर तिच्याविरुद्ध जोरदार ट्विटरवॉर सुरू झालंय. एवढंच नाही तर तिला बलात्काराच्या धमक्याही आल्या. गुरमेहर कौर ही कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकाची मुलगी आहे. पण या ट्विटवरून गुरमेहेर ही देशद्रोही आहे, असा प्रचार तिच्याविरद्ध केला झाला.  अखेर सोशल मीडियावर एवढी टीका झाल्यानंतर आता गुरमेहरने या सगळ्या आंदोलनातून माघार घेतलीय.

मार्क झकरबर्गने मागितली माफी

फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झकरबर्गनं चक्क माफी मागितली. माझं काम लोकांना विभागण्यासाठी वापरलं गेलं, खरंतर ते लोकांना एकत्र आणण्यासाठी होते, असं म्हणत मार्क झकरबर्गने माफीनामा सादर केला. मात्र, या पत्राला राजकीय परिमाण होते. अमेरिकेच्या 2016च्या अध्यक्षीय निवडणुकीत रशियन कंपन्यांनी ट्रम्प यांना मत द्या, असं सांगणाऱ्या जाहिराती फेसबुकवर दिल्या. हिलरी क्लिंटन यांच्याबद्दल अपप्रचार करणाऱ्याही जाहिराती त्यांनीच दिल्या. फेसबुकया जाहिराती नाकारू शकत होतं. पण तसं झालं नाही. आणि आताही हे सगळं फेसबुकनं कबुल केलेलं नाही. अमेरिकेच्या काँग्रेसनं केलेली चौकशी आणि शोध पत्रकारांच्या मेहनतीतून हे सगळं पुढे आलंय. दुसरं म्हणजे, राजकीय नेते, त्यांचे समर्थक फेसबुकचा वापर अफवा पसरवणे किंवा कोणत्या समुदायाला टार्गेट करण्यासाठीही करत असतात. फेसबुकला यालाही आळा घातला आलेला नाही. या सगळ्यामुळेच मार्कनं माफी मागितली असावी, असं तज्ज्ञांचं मत आहे.

'सेल्फी'घाताचे बळी

सोशल मीडियाच्या आहारी गेल्याने अनेकांनी जीव गमावले. फक्त 6 महिन्यात सेल्फीच्या नादात 8 ते 10 दुर्घटना घडल्या असून त्यात किमान 20 ते 25 जणांचा बळी गेलाय.

सोशल मीडियावर हॅशटॅगची क्रेझ

सोशल मीडियावर हॅशटॅग नाही केलं तर मग काय केलं ?, असं सरळ समिकरण आहे. तुम्ही जर साधी पोस्ट जरी करत असाल तरी तुम्हाला हॅशटॅग वापरावाच लागणार हा साधा नियम आहे. या वर्षीच्या मध्यामध्ये सर्वात गाजला #प्रिये हा हॅ्शटॅग.. फेसबुक, ट्विटर, जिथे बघाव तिथे #प्रिये या हॅशटॅगसह नेटकरी आपले विचार मांडत होते.  हास्य कवी संमलेनात डॉ. सुनील जोगी या कवीने सादर केलेल्या 'मुश्किल है अपना मेल प्रिये, ये प्‍यार नहीं है खेल प्रिये' या कवितेतून #प्रिये हा हॅशटॅग आला होता. या आधीही '#sixwordstories', '#amarphotostudio' या सारखे अनेक हॅशटॅग्जना नेटकऱ्यांनी उचलून धरलं होतं. तसंच या वर्षी निवडणुकीच्या काळातही अनेक हॅशटॅग चर्चेत राहिले. त्यात सर्वांच्या लक्षात राहिला तो 'विकास गांडो थायो छे' अमित शहा यांच्या एका वक्तव्यामुळे सोशल मीडियावर  'विकास गांडो थायो छे' हा हॅशटॅग अधिक वापरला गेला.

सत्ताधाऱ्यांना हॅशटॅगमधून सवाल

कर्जमाफी दिली तर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत याची हमी देणार का असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्याविरोधात रान उठलं होतं. सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांना थेट सवाल करत #हमी हा हॅशटॅग चांगलाच गाजला. त्यापाठोपाठ #शेतकरी_कर्जमाफी हा हॅशटॅग वापरला गेला. लोकांना मोठ्या संख्येनं हे हॅशटॅग वापरून सत्ताधाऱ्यांच्या नाकी नऊ आणले.

ट्रोलधाडकऱ्यांचा धुमाकूळ

तुमचा जाहीर कुणी अपमान केला, तुम्हाला हिणवलं तर.साहजिकच तुमच्या तळपायाची आग मस्ताकात जाईल. सोशल मीडियावरही अनेक सेलिब्रिटींना ट्रोलचा फटका बसला होता. भारतीय टीमचा गोलंदाज इरफान पठाणने आपल्या पत्नीसोबत फोटो शेअऱ केल्यामुळे ट्रोल झाला होता. त्यानंतर मोहम्मद शमीनेही आपल्या पत्नीसोबत फोटो शेअर केल्यामुळे ट्रोलकऱ्यांना त्याच्या पत्नीच्या ड्रेसवर शंका घेत ट्रोल केलं होतं. आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्राने शार्ट ड्रेसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. या भेटीमुळे ट्रोल भक्तांनी प्रियांकाला ट्रोल केलं होतं. पार्श्वगायक सोनू निगमही अजानवर आक्षेप घेतल्यामुळे ट्रोल झाला होता. मुस्लिम समाजातील मौलानांनी सोनूचं टक्कल करण्याची धमकी दिली होती. तेव्हा सोनूने टक्कल करून भर पत्रकार परिषदेत हजेरी लावली.  अलीकडेच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा विवाहबंधनात अडकले. त्यांना  ड्युरेक्स इंडियानेही दिल्या आणि ते सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल झाले.

सोशल मीडियाचे बळी

फेसबुकवर पोस्ट टाकून आत्महत्या करण्याची संख्या चिंताजनक आहे. एप्रिलमहिन्यात अर्जुन भारद्वाज या तरुणाने मुंबईतील वांद्रे परिसरातील पंचतारांकित हाॅटेलमध्ये 19 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे त्यांने फेसबुकवर लाईव्ह व्हिडिओ करून आत्महत्या केली.

 'ब्लू व्हेल चॅलेन्ज'

मुंबईतही एका 14 वर्षांच्या मुलानं याच 'ब्लू व्हेल चॅलेन्ज' गेममुळे आत्महत्या केली होती. 'ब्लू व्हेल चॅलेन्ज' या गेममुळे जगभरात जवळपास 150 पेक्षा जास्त मुलांनी आत्महत्या केल्यात.  ब्लू व्हेल चॅलेंज हा गेम जगभर पसरलाय आणि आतापर्यंत 19 देशात 200 मुलांचे जीव या देशाने घेतले आहेत. यातले 130 मृत्यू रशियातच झाले आहेत. अमेरिका आणि आफ्रिकेतही अनेकांचे जीव गेले आहेत. द ब्लू व्हेल गेम'ला 25 वर्षांच्या के. फिलीप बुडेकिन या तरुणाने 2013 साली बनवला होता. रशियामध्ये 2015 साली या गेमने पहिला बळी घेतला होता. त्यानंतर फिलीपला तुरूंगवास ठोठावण्यात आला होता.

भारतात वाढत्या घटना लक्षात घेता अखेर  मुलांच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या ब्लू व्हेल गेमवर केंद्र सरकारने अखेर बंदी घातलीये.

एकंदरीतच काय तर  अनेक घटना-घडामोडींनी सोशल मीडिया गाजलं आणि अनेक घटना सोशल मीडियामुळेही घडल्यात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 31, 2017 02:05 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

But the job is not done yet!
vote for the deserving condidate
this year

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close