S M L

स्मार्टफोन नोकिया 8 लंडनमध्ये लॉन्च

यातले 13 मेगापिक्सलचे दोन रिअर कॅमेरे आणि फ्रंट पॅनलवर सुध्दा 13 मेगापिक्सलचा आरजीबी सेंसर दिला गेलाय.

Sonali Deshpande | Updated On: Aug 20, 2017 03:24 PM IST

स्मार्टफोन नोकिया 8 लंडनमध्ये लॉन्च

स्नेहल पाटकर, 20 आॅगस्ट : एचएमडी ग्लोबलनं नोकिया ब्रॅन्डचा फ्लॅगशिप स्मार्टफोन नोकिया 8 लंडनमध्ये लॉन्च केलाय. हा स्मार्टफोन कंपनीचं पहिलं प्रोजेक्ट आहे ज्याला कार्ल जाॅइससोबत भागिदारीत बनवलं गेलंय. म्हणजेच याची खासियत आहे यातले 13 मेगापिक्सलचे दोन रिअर कॅमेरे आणि फ्रंट पॅनलवर सुध्दा  13 मेगापिक्सलचा आरजीबी सेंसर दिला गेलाय.

काय आहे नोकिया 8ची खासियत ?


1. यामध्ये बोथीज मोड देण्यात आला आहे. ज्यामुळे फ्रंट आणि रिअर कॅमेरानं एकाच वेळी फोटो काढता येणार आहे.

2. 360 डिग्री व्हर्च्युअल कॅमेराही यात आहे.

Loading...

3. फ्रंट आणि रिअर कॅमेऱ्यानी 4 के रिझॉल्यूशन व्हिडियो रेकॉर्ड करणं शक्य होणारेय.

4. रिअर कॅमेरा लेझर ऑटोफोकस आणि ड्युअल-टोन एलईडी फ्लॅशच्या सोबत आहे.

5. हा स्मार्टफोन ग्लॉसी पॉलिश्ड ब्लू आणि पॉलिश्ड कॉपर या दोन रंगांत उपलब्ध आहे, या शिवाय मॅट टेंपर्ड ब्लू आणि स्टील फिनिश वेरिएंट सुध्दा यांत येईल,

6. Nokia 8 आयपी54 ने सुरक्षित आहे

7.याची बॅटरी 3090 mAh आहे. तसंच यामध्ये फास्ट चार्जिंग सपोर्टिव्ह फीचरही आहे.

8.कंपनीनं दावा केलाय की, ड्युअल साइट व्हिडियो स्ट्रीमिंग करताना फोन गरम होणार नाही यासाठी कंपनीनं क्वालकॉम सपोर्ट घेतलाय.

9.या स्मार्टफोनमध्ये हाय डायनॅमिक रेंज माइक्रोफोन दिले गेलेत.

10.क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 835चा प्रोसेसर यात आहे, हा फोन अँड्रॉईड 7.1.1 नोगट वर चालतो.

11.या फोन मध्ये 4 जीबी रॅमच्या सोबत 64 जीबी स्टोरेज असेल 256 जीबी पर्यंत तुम्ही एक्स्पांड करु शकता.

12.ड्युअलसिमच्या या फोनमध्ये 3090 mAh ची बॅटरी देण्यात आलीय.

13.Nokia 8 मध्ये 5.3 इंचाचा 2के एलसीडी डिस्प्ले आहे ज्यावर कॉर्निंग गोरिला ग्लास 5 चं प्रोटेक्शन आहे, तर 3.5 एमएम हेडफोन जॅक यात आहे तर यूएसबी 3.1 टाइप-सी कनेक्टिविटीला सपोर्ट करतो.

Nokia 8 ला आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सप्टेंबरच्या सुरुवातीला उपलब्ध केले जाईल, तर भारतात ऑक्टोबरच्या सुरुवातीला हा स्मार्टफोन उपलब्ध होईल.

नोकिया 8 ची किंमत 599 यूरो म्हणजेच सुमारे 45 हजार रुपये असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 20, 2017 03:24 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close