6 वर्षांनंतर स्काइपमध्ये मोठे बदल, हे आहेत नवे फिचर्स !

या ६ वर्षांमध्ये पहिल्यांदाच स्काइपच्या फिचर्समध्ये बदल केले आहेत. तर या नवीन skype च्या अपडेटमध्ये इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅटसारख्या अॅपमधील बघायला मिळतील

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 10, 2017 06:34 PM IST

6 वर्षांनंतर स्काइपमध्ये मोठे बदल, हे आहेत नवे फिचर्स !

10 जून : माइक्रोसॉफ्ट कंपनीने त्यांच्या व्हिडिओ आणि स्काइपमध्ये नवीन फिचर्स आणले आहेत. असं सांगितलं जात आहे की, या ६ वर्षांमध्ये पहिल्यांदाच स्काइपच्या फिचर्समध्ये बदल केले आहेत. तर या नवीन skype च्या  अपडेटमध्ये इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅटसारख्या अॅपमधील बघायला मिळतील.   मग काय आहेत हे नवीन फिचर्स बघुया तर...

कंपनीने "Find", "Chat", आणि "Capture" यासारख्या ३ नवीन विंडोज आणल्या आहेत. "Find" च्या फिचर्समध्ये हवामान, पोल, GIF, शो तिकीट यासारखे ऑप्शन देऊन युजर्स आपल्या मोबाईलच्या कॉनटॅक्ट मधून शेअर करू शकतात.

दुसऱ्या म्हणजेच "Chat" च्या फिचर्समध्ये कलरफुल बॅग्राऊंड ठेऊ शकतो आणि शेवटची विेंडोज म्हणजेच "Capture" च्या फिचर्समध्ये स्नॅपचॅटसारख्या स्टोरीज आपल्याला बघता येतील. तसंच ह्या फिचर्सवर क्लिक केल्यावर इमोजी किंवा विविध फिल्टर उपलब्ध होतील, त्या मधून व्हिडिओ किंवा फोटो काढू शकतात. याचबरोबर "Highlight" सारखा फिचरसुद्धा वापरता येणार असून Add ह्या ऑप्शनवर क्लिक केल्यावर फोटो किंवा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींना दिसू शकतात.

कंपनीने सध्या तरी हे फिचर्स अँड्रॉइड स्मार्टफोनवरच उपलब्ध करुन दिले आहेत. लवकरच हे अपडेट फिचर्स iOS, विंडोज आणि Mac सारख्या युजर्सरकरीता उपलब्ध होतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 10, 2017 06:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...