'नमस्ते इंडिया', मुंबईकरांच्या भेटीला साडी नेसून आली रोबोट सोफिया !

भगव्या रंगाची साडी नेसून भारतीय संस्कृती प्रमाणे 'नमस्ते इंडिया' म्हणत सोफियाने भारतीयांची मनं जिंकली.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 30, 2017 08:15 PM IST

'नमस्ते इंडिया', मुंबईकरांच्या भेटीला साडी नेसून आली रोबोट सोफिया !

30 डिसेंबर : 'नमस्ते इंडिया' म्हणत जगातली पहिली रोबोट सोफियाने भारतीयांची मनं जिंकलीये.  मुंबई आयआयटीच्या टेक फेस्टमध्ये सौदी अरेबियाची नागरिक असलेल्या रोबोट सोफियाने हजेरी लावली.

सोफिया ही जगातली पहिली रोबोट आहे जिला सौदी अरेबियानं नागरिकत्व दिलंय. तिला पाहण्यासाठी सर्वच वयोगटातल्या लोकांनी गर्दी केली होती. भगव्या रंगाची साडी नेसून भारतीय संस्कृती प्रमाणे 'नमस्ते इंडिया' म्हणत सोफियाने भारतीयांची मनं जिंकली. माणसाप्रमाणंच हालचाल करत तिनं विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली.

तिला प्रत्यक्ष पहाण्यासाठी मुंबई आयआयटीच्या सभागृहात सर्वच वयोगटातील लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. माणसांप्रमाणेच हालचाल करत तीने विचारलेल्या सर्वच प्रश्नांची उत्तरे दिली. अगदी तूला कुणा मुलाशी लग्नं करावंसं वाटतं का...? याचं ही उत्तर तिने दिलं.

सोफियाची उत्तरं ऐकून उपस्थित विद्यार्थी चांगलेच खूष झाले. एक रोबोट आपल्याशी बोलतोय. याचं त्यांना मोठं कौतुक वाटत होतं.

सौदी अरेबियाची नागरिक असलेल्या सोफियाने आपल्याला संवेदना ही असल्याचं यावेळी सांगितलं. सोफिया एक रोबोट आहे, त्यामुळे तिच्याही काही मर्यादा आहेत. पण भविष्यातील मानव आणि तंत्रज्ञान यांच्यातील अंतर कमी होताना दिसतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 30, 2017 08:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...