सॅमसंगचा गॅलक्सी note 8 लाँच, हे आहेत फिचर्स आणि किंमत

सॅमसंग note 8 हा अनेक नव्या फिचर्ससह स्मार्टफोन प्रेमींच्या भेटीला आलाय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 12, 2017 09:32 PM IST

सॅमसंगचा गॅलक्सी note 8 लाँच, हे आहेत फिचर्स आणि किंमत

12 सप्टेंबर : सॅमसंगच्या बहुप्रतिक्षित नोट सिरीजचा सातवा स्मार्टफोन गॅलक्सी note 8 अखेर भारतात लाँच झालाय. सॅमसंग note 8 हा अनेक नव्या फिचर्ससह स्मार्टफोन प्रेमींच्या भेटीला आलाय. विशेष म्हणजे या फोनची स्क्रीन ही 6.3 इंचाची आहे. या फोनची किंमत 67,900 इतकी असणार आहे.

सॅमसंग  note 8 ची स्क्रीन क्वाड HDSuper AMOLED इन्फिनिटी डिस्प्ले आहे. 12 मेगापिक्सल डुअल रिअर कॅमेरा असून यात टेलीफोटो लेंस आणि दुसरा कॅमेऱा हा वाईड अँगल लेन्स आहे.

कंपनीने दावा केलाय की, लोकांचा या फोननंतर DSLR फोटो क्लिक करण्याचा ट्रेंड कमी होईल.

असा आहे सॅमसंग गॅलक्सी note 8

स्क्रीन - 6.3 इंच

Loading...

कॅमेरा - 12 मेगापिक्सल रिअर आणि 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा

डुअल कॅमरा फोटो कॅप्चर

सिस्टिम - एंड्रॉएड नूगा OS

रॅम - 6GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज

बॅटरी - 3,300mAh

वायरलेस चार्जिंग

या फोनचं प्री-बुकिंग आजपासून सुरू झालंय आणि विक्री 21 सप्टेंबरपासून होणार आहे. जर तुम्ही एचडीएफसी क्रेडिट कार्डने खरेदी करणार असाल तर तुम्हाला 4000 रुपये कॅशबॅक मिळतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 12, 2017 09:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...