S M L

रॉयल एनफिल्डचं हिमालयन स्लीट मॉडेल आता भारतात!

या मॉडेलचे केवळ 500 युनिट्स तयार करण्यात येणार असून ती फक्त ऑनलाईन बुकिंगवर उपलब्ध असेल. तुम्ही 5000 रुपये टोकन अमाऊंट देऊन या बाईकचं बुकिंग करू शकता.

Sachin Salve | Updated On: Jan 13, 2018 09:03 PM IST

रॉयल एनफिल्डचं हिमालयन स्लीट मॉडेल आता भारतात!

13 जानेवारी : रॉयल एनफिल्डनं हिमालयनचे स्लीट मॉडेल नुकतेच भारतात लाँच करण्यात आले आहे. या नवीन रॉयल एनफिल्ड हिमालयन स्लीट बाईकची चेन्नईमध्ये ऑन रोड किंमत 2 लाख 12 हजार 666 रुपये इतकी आहे. रॉयल एनफिल्डचं हे नवीन मॉडेल मर्यादित प्रमाणातच बाजारात उपलब्ध आहे. या मॉडेलचे केवळ 500 युनिट्स तयार करण्यात येणार असून ती फक्त ऑनलाईन बुकिंगवर उपलब्ध असेल. तुम्ही 5000 रुपये टोकन अमाऊंट देऊन या बाईकचं बुकिंग करू शकता.

हिमालयन स्लीटची बुकिंग 12 जानेवारी ते 30 जानेवारीपर्यंतच करता येणार आहे. बुकिंग करण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं महत्त्वाचं आहे. 30 जानेवारीला हिमालयन स्लीटची थेट विक्री होणार आहे. त्यामुळे आधी ही गाडी विकत घेईल त्याला कंपनीकडून ऑफर असेल.

पाहुयात काय असणार आहे या रॉयल एनफिल्ड हिमालयन स्लीट बाईकचं वैशिष्ट्य

- या बाईकला आर्मीचा रंग दिला गेला आहे, जो हिमालयात खूप महत्त्वाचा मानला जातो.

- यामध्ये एक्सप्लोअरर किट देखील देण्यात आली आहे, ज्यात 26 लीटर वॉटर रेजिस्टंट अॅल्युमिनियम पेनियर्स, पेनियर माऊंटिंग रेल्स, ऑफ रोड स्टाईल हँडलचा समावेश आहे.

- आधीच्या मॉडेलपेक्षा 28 हजार रुपये जास्त किमतीची ही बाईक आहे.

- या हिमालयन स्लीटमध्ये स्टँडर्ड मॉडेलचे इंजिन वापरण्यात आले आहे.

- हे इंजिन 411 सीसीचं सिलेंडर फ्युएल इंजेक्टेड आहे, जे 24 बीएचपी पॉवर आणि 32 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते.

- बाईकच्या समोर आणि मागील व्हीलमध्ये डिस्क ब्रेकसुद्धा देण्यात आले आहेत.

ऑफर संपण्याच्या आधी जर तुम्ही ही बाईक खरेदी केली तर तुम्हाला 2 वर्षांच्या वॉरंटीचा लाभ घेता येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 13, 2018 09:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close