S M L

दिवाळीनिमित्त जिओ-2 फोनचा खास सेल

जिओ कंपनीने दिवाळीनिमित्त आत्ताच लाँच झालेल्या जिओ-2 फोनमध्ये सेल देण्याचं ठरवलं आहे. कमीत-कमी बजेटमध्ये भेटवस्तू देता यावी यासाठी जिओने हा सेल जाहीर केला आहे.

Updated On: Nov 4, 2018 04:46 PM IST

दिवाळीनिमित्त जिओ-2 फोनचा खास सेल

मुंबई, 4 नोव्हेंबर : दिवाळीच्या सणात जर नातेवाईकांसाठी किंवा मित्रासाठी भेटवस्तूच्या शोधात असाल तर तुमच्या या अडचणीला दूर करण्यासाठी जिओने नवीन फोन लाँच केला आहे. भेटवस्तू म्हणून तुम्ही JIOPHONE2 देऊ शकता. कारण आता रिलायन्सने 7 दिवसांसाठी JIOPHONE2चा सेल सुरू केला आहे. ज्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारची वाट न पाहता हा फोन खरेदी करू शकता. या फोनचा सेल 5 नोव्हेंबरपासून 12 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. या सेलमध्ये PayTM व्दारे फोन खरेदी केल्यास 200 रुपयांचे कॅशबॅक मिळणार आहे.


जिओ कंपनीने जिओ फोनच्या डिवाईससाठी 49, 99 आणि 153 असे तीन प्रिपेड रिचार्ज ठेवण्यात आले आहेत. एवढ्या कमी पैशात तुम्हाला 1 GBपासून ते 42 GBपर्यंतचा डेटा दिला जाणार आहे. त्याचबरोबर या फोनमुळे आणखी फायदे होणार आहेत. 153 रुपयांच्या जिओ फोन प्लानमध्ये एका दिवसासाठी 1.5 GB डेटा देण्यात येणार आहे. हा प्लॅन 28 दिवस असेल. 99 रुपयांच्या जिओ फोन प्लॅनमध्ये एका दिवसासाठी 0.5 GB डेटा देणार आहेत. यासोबतच तुम्ही फ्री कॉलिंग आणि 300 SMS करू शकता. आणि 49 रुपयांच्या जिओ फोन प्लॅनमध्ये 1 GB डेटा देणार आहेत. यासोबत तुम्ही फ्री कॉलिंग आणि 50 SMS करू शकता. हे दोन्ही प्लॅन 28 दिवसांचे आहेत. जिओ प्लॅननुसार हाय स्पीड डेटा संपल्यावर यूजरला 64 kbpsचा स्पीड देण्यात येईल.


आधीच्या जिओ फोनच्या तुलनेत या  फोनमध्ये अपडेटेड फिचर्स देण्यात आले आहेत. या जिओ-2 फोनमध्ये तुम्ही व्हॉटस अप, फेसबुक आणि यु ट्यूबचा वापर करू शकता. याबरोबरच जिओचे सगळे अॅप तुम्हाला वापरायला मिळणार आहेत.

Loading...


 

जोडप्याला पोलिसांनी बेदम मारलं, VIDEO झाला व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 4, 2018 04:33 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close