News18 Lokmat

'जीओ' वर सुरू झाली आयफोन XS आणि XS Max ची प्री बुकिंग

अॅप्पल आपले सर्वात महागडे फोन XS आणि XS Max मॅक्स भारतीय बाजारपेठेत आणणार आहे. अॅप्पलच्या या दोनही फोनला आता जीओची मदत मिळणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 21, 2018 09:56 PM IST

'जीओ' वर सुरू झाली आयफोन XS आणि XS Max ची प्री बुकिंग

मुंबई, ता. 21 सप्टेंबर : अॅप्पल आपले सर्वात महागडे फोन XS आणि XS Max मॅक्स भारतीय बाजारपेठेत आणणार आहे. अॅप्पलच्या या दोनही फोनला आता जीओची मदत मिळणार आहे हे या फोनचं वैशिष्ट्य आहे. 21 सप्टेंबरपासून या फोनचं प्री-बुकिंग होणार असून www.jio.com आणि रिलायंस डिजिटलच्या माध्यमातून याचं प्री-बुकिंग करता येणार आहे. त्याचबरोबर MyJio स्टोरवर आणि MyJio अॅप वरही हा फोन उपलब्ध आहे.

अॅपलने पहिल्यांदाच या फोनमध्ये ड्युएल सीम कार्डची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचबरोबर या दोनही फोनमध्ये प्रीपेड आणि पोस्टपेडची सुविधाही राहणार आहे. ड्युएल सीम कार्डमुळं ग्राहकांना फायदा होणार आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी! 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस

या फोनमध्ये ए12 बायोनिक प्रोसेसर चिप आहे. त्यामुळे फोनचा वेग 50 टक्क्यांनी वाढणार आहे. त्यामुळं फेसआयडी जास्त अॅक्टिव्ह होणार असून फोन लवकर अनलॉक होणार आहे.

(डिस्क्लेमर: न्यूज18 लोकमत रिलायंस इंडस्ट्रीज ची कंपनी नेटवर्क18 मीडिया अँड इन्वेस्टमेंट लिमिटेड चा भाग आहे. नेटवर्क18 मीडिया अँड इन्वेस्टमेंट लिमिटेड ची मालकी रिलायंस इंडस्ट्रीजकडे आहे.)

Loading...

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 21, 2018 09:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...