S M L

व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनशी वाद घालणं आता पडू शकतं महागात

ग्रुपमध्ये पोस्ट कोण टाकणार ते ठरवण्याचा अधिकार व्हॉट्सअॅपने अॅडमिनला दिला आहे. मेसेज, फोटो, व्हिडिओ, जीआयएफ आणि व्हॉईस मेसेज कुणी पाठवायचा, याचा निर्णय आता अॅडमिन घेईल.

Sonali Deshpande | Updated On: Dec 10, 2017 11:46 AM IST

व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनशी वाद घालणं आता पडू शकतं महागात

10 डिसेंबर : व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनशी वाद घालणं तुम्हाला आता महागात पडू शकतं. कारण ग्रुपमध्ये पोस्ट कोण टाकणार ते ठरवण्याचा अधिकार व्हॉट्सअॅपने अॅडमिनला दिला आहे. मेसेज, फोटो, व्हिडिओ, जीआयएफ आणि व्हॉईस मेसेज कुणी पाठवायचा, याचा निर्णय आता अॅडमिन घेईल.

WHATSAPP Beta Info च्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपच्या 2.17.430 या व्हर्जनमध्ये ही नवं अपडेट देण्यात आलंय. "Restricted Groups" असं या नव्या सेटिंगचं नाव असण्याची शक्यता आहे.

अॅडमिनने तुम्हाला मेसेज करण्यासाठी बंदी घातली तर तुम्ही ग्रुपमधील मेसेज फक्त वाचू शकता. त्याला रिप्लाय देता येणार नाही. बंदी घातलेल्या ग्रुपमधल्या सदस्याला 'मेसेज अॅडमिन' या ऑप्शनवर क्लिक करुन मेसेज करावा लागेल. पण तो मेसेज अॅडमिननं त्यावेळी स्वीकारणं गरजेच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 10, 2017 11:46 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close