News18 Lokmat

नोकिया भारतात 5जी नेटवर्क सेवा सुरू करणार

2020 पर्यंत नोकियाचं 5जी नेटवर्क कार्यन्वित होण्याची शक्यता आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 19, 2018 08:55 AM IST

नोकिया भारतात 5जी नेटवर्क सेवा सुरू करणार

19 मे : काही वर्षांपूर्वी आपल्या मोबाईल हँन्डसेटसाठी प्रसिद्ध असणारी फिनलॅण्डची कंपनी नोकिया भारतात 5जी नेटवर्क सेवा सुरू करणार आहे. सुरूवातीला प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणाऱ्या 5जी सेवेसाठी नोकिया बंगळुरूत विकास केंद्र उभारणार आहे. 2020 पर्यंत नोकियाचं 5जी नेटवर्क कार्यन्वित होण्याची शक्यता आहे. सध्या एअरटेल भारती आणि बीएसएनएलच्या मदतीने प्रायोगिक तत्वावर भारतात 5जी सेवा सुरू करण्याचा कंपनीचा मानस आहे.

भारतामध्ये  5जी नेटवर्कसाठी नोकिया भारतामध्ये संशोधन आणि विकास केंद्राची बंगळुरुमध्ये स्थापना करणार आहे. या केंद्राच्या प्रमुख रुपा संतोष यांनी माहिती दिली. 5 जी मोबाईल नेटवर्कसाठी तयारी आम्ही सुरू केली असून क्लाऊड तसंच मोठ्या डेटा सेंटर्सवर आम्ही विशेष लक्ष केंद्रीत करणार असल्याचे रूपा यांनी सांगितलं. तसंच 2018मध्ये या केंद्राशी संबंधित कर्मचार्यांची संख्या वाढवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

जगभरातील अनेक कंपन्या 5जी नेटवर्कची स्थापना करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 2020 पासून हे नेटवर्क कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. 5 जीमुळे वॉयरस (मोबाईल आणि डेटा टर्मिनल्सच्यामध्ये गतीमान देवणघेवाणीचे मोजण्याचे एकक), डेटा आणि व्हिडिओ ट्रफिकबरोबरच ब्रण्ड विड्थच्या माध्यमातून जास्तीत जास्त वेगात इंटरनेट सेवा वापरता येतील.

आम्ही आधीच युरोपमधील औद्योगिक आणि शैक्षणिक संस्थांशी 5जी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी करार केला असल्याची माहिती रुपा यांनी दिली. मात्र, 2018मध्ये नक्की किती जणांना नोकरी देणार याबद्दलची माहिती अद्याप कंपनीकडून देण्यात आलेली नाही. सध्या कंपनीसाठी भारतात 6 हजार इंजिनियर्स काम करत आहेत. याशिवाय, अमेरिका आणि चीनमध्येही कंपनीची संशोधन केंद्रे आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 19, 2018 08:55 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...