लवकरच नेटवर्क नसतानाही करता येणार काॅल !

देशभरात लवकरच इंटरनेट टेलिफोनीला मान्यता देण्यात येणार आहे.

Sachin Salve | Updated On: May 2, 2018 08:04 PM IST

लवकरच नेटवर्क नसतानाही करता येणार काॅल !

नवी दिल्ली, 02 मे : अनेकवेळा नेटवर्क नसल्यामुळे तुम्हाला महत्त्वाचे फोन करता येत नाही आणि तुम्ही मोबाईल फोन कंपन्यांच्या नावानं लाखोल्या वाहता. मात्र आता यापुढे नेटवर्क नसतानाही तुम्हाला कॉल करता येणार आहे. देशभरात लवकरच इंटरनेट टेलिफोनीला मान्यता देण्यात येणार आहे.

TRAI च्या नियामक मंडळाने गेल्या ऑक्टोबर महिन्यात यासंबंधी प्रस्ताव मांडला होता. दूरसंचार आयोगाने हा प्रस्ताव मंजूर केला आहे. यामुळे देशातल्या प्रमुख मोबाईल फोन सेवा देणाऱ्या कंपन्या लवकरच इंटरनेट टेलिफोनी सुरू करू शकतात.

दरम्यान, यापुढे सिम कार्ड घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्डची प्रत देणं सक्तीचं असणार नाही. ड्रायव्हिंग लायसन्स, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट यासारखे इतर ओळखपत्र सादर करून तुम्ही सिम कार्ड मिळवू शकता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 2, 2018 08:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close