फोन कनेक्ट करताच फुल चार्ज करणारा पाॅवर बँक

हा पाॅवर बँक अँड्रॉइड आणि आईफोनला कनेक्ट करता येतो. याची किंमत 45 डॉलर्स म्हणजेच 2900 रुपये आहे.

Sonali Deshpande | Updated On: Nov 20, 2017 05:26 PM IST

फोन कनेक्ट करताच फुल चार्ज करणारा पाॅवर बँक

20 नोव्हेंबर : आताच्या तंत्रज्ञानाच्या युगात आपला फोन खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यात जर त्याची चार्जिंग संपलं तर मग झालंच ! पण यावर उपायही खूप आहेत. असाच एक उपाय म्हणजे पाॅवर बँक. त्यातही आता जर फोन कनेक्ट करताच जर चार्ज झाला तर?

होय, इलेक्ट्रिक कार बनवणाऱ्या टेस्ला कंपनीने आता एक नवा पाॅवर बँक बाजारात आणला आहे. या पाॅवर बँकचं खास वैशिष्ट्य म्हणजे आपण या पाॅवर बँकला फोन कनेक्ट करताच तो पूर्ण चार्ज होतो. हा पाॅवर बँक अँड्रॉइड आणि आईफोनला कनेक्ट करता येतो. याची किंमत 45 डॉलर्स म्हणजेच 2900 रुपये आहे. हा पाॅवर बँक विकत घेतल्यास त्याच्याबरोबर युएसबी, माइक्रो युएसबी आणि अॅप्पल लाइटनिंग कनेक्शन मिळेल.

या पाॅवर बँकची काय आहेत वैशिष्ट्य?

- हा पावर बँक 3350 mAh क्षमतेचा आहे.

- यात एक सिंगल 18650 सेल वापरण्यात आला आहे.

- दिसायला इतर पाॅवर बँकसारखाच आहे पण सगळ्यात जास्त क्षमता या टेस्लाने बनवलेल्या पाॅवर बँकमध्ये आहे.

- हा पावर बँक खूप पातळ आणि छोटा आहे त्यामुळे आपण त्याला कोणत्याही ठिकाणी घेऊन जाऊ शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 20, 2017 05:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close