व्हॉट्सअॅपचं नवं फिचर;आता कळेल तुमचं लोकेशन

व्हॉट्सअॅपच हे नवीन फिचर एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड आहे.म्हणजे तुमचं लाइव्ह लोकेशन कुणा पाहावं आणि कुणी नाही हे तुमच्या हातात आहे.हे फिचर शोर्ट टर्म आहे. तुम्ही हवं तेव्हा लाईव्ह लोकेशन ऑन करू शकता.

Chittatosh Khandekar | Updated On: Oct 18, 2017 03:55 PM IST

व्हॉट्सअॅपचं नवं फिचर;आता कळेल तुमचं लोकेशन

18 ऑक्टोबर:आता व्हॉट्सअॅपवर तुमच्या जवळच्या मित्रांना तुमचं लोकेशन कळू शकणार आहे.कारण व्हॉट्सअॅपने नवीन लाइव्ह लोकेशन फिचर लॉँच केलंय.

व्हॉट्सअॅपच हे नवीन फिचर एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड आहे.म्हणजे तुमचं लाइव्ह लोकेशन कुणा पाहावं आणि कुणी नाही हे तुमच्या हातात आहे.हे फिचर शोर्ट टर्म आहे. तुम्ही हवं तेव्हा लाईव्ह लोकेशन ऑन करू शकता. जर प्रवास करत असाल तर प्रवासात कुठे आहात हे तुमच्या जवळच्या माणसांना कळेल आणि प्रवास संपल्यावर तुम्ही हे फिचर बंद करू शकता. एवढंच नाही तर आपलं लाईव्ह लोकेशन तुम्ही तुमच्या मित्रांना मेसेजवर सेन्डही करू शकता. तसंच एखाद्या ग्रुपवर शेअरही करू शकता. आपल्या मित्रांसोबत सतत कनेक्टमध्ये राहण्यासाठी व्हॉट्सअॅपचं हे नवीन फिचर मदतीस येणार आहे.

असं वापरा हे फिचर

अॅपल प्ले स्टोर किंवा गुगल प्ले स्टोरमध्ये जा. तिथे जाऊन आपलं व्हॉट्सअॅप अपडेट करा. त्यानंतर व्हॉट्सअॅपच्या कॉन्टॅक्टमध्ये जा. तिथे जाऊन तुम्ही हे लाईव्ह लोकेशन फिचर अपडेट करू शकता. तसंच मग सिलेक्ट करून आपल्या मित्रांसोबत तुम्ही हे अॅप शेअर करू शकता.सध्या तरी हे फिचर फक्त अॅन्ड्रॉइड आणि

आयओएसवर वापरता येतं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 18, 2017 03:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close