तरुणांसाठी गुगलची खास सेवा 'गुगल फॉर जॉब्स'

बेरोजगार तरुणांसाठी आता गुगलने खास सेवा सुरू केली आहे. 'गुगल फॉर जॉब्स' असं या फीचरचं नाव आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Apr 25, 2018 04:20 PM IST

तरुणांसाठी गुगलची खास सेवा 'गुगल फॉर जॉब्स'

25 एप्रिल : बेरोजगार तरुणांसाठी आता गुगलने खास सेवा सुरू केली आहे. 'गुगल फॉर जॉब्स' असं या फीचरचं नाव आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्याचं काम सोपं व्हावं यासाठी गुगलकडून हा प्रयत्न करण्यात आला आहे.

गुगलने ही सेवा पहिल्यांदा अमेरिकेत सुरू केली होती. सध्या ही सेवा इंग्रजीमध्येचं उपलब्ध होणार आहे. याशिवाय टाईम्स जॉब्स, शाईन जॉब्स आणि लिंकडिन यासारख्या अनेक संकेतस्थळांसोबतही गुगलने भागीदारी केली आहे. या योजनेत राज्य सरकारबरोबरही करार करण्याचा गुगलचा प्रयत्न सुरू आहे.

गुगलच्या या नव्या सेवेमुळे अनेक तरूणांना नोकरी मिळवणं सोपं जाणार आहे. याची योग्य प्रकारे अमंलबजावणी केली गेल्यास या बेरोजगारी कमी होण्यास नक्कीच मदत होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 25, 2018 09:09 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close