चोवीस तासांपेक्षा जास्त वेळ राहणार इन्स्टाग्राम स्टोरीज

आत्तापर्यंत इन्स्टाग्राम किंवा फेसबुकवर पोस्ट केल्या जाणाऱ्या स्टोरीज‌नां चोवीस तासांची मर्यादा होती, पण आता इन्स्टाग्रामच्या लेटेस्ट अपडेटनंतर पोस्ट केल्या जाणाऱ्या स्टोरीज या वेगळ्या प्राइव्हेट स्पेसमध्ये सेव्ह होणार आहेत.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 13, 2017 05:30 PM IST

चोवीस तासांपेक्षा जास्त वेळ राहणार इन्स्टाग्राम स्टोरीज

13 डिसेंबर : फेसबुकचा फोटो शेअरींग अॅप आणि इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअरींग या फिचरमध्ये काही बदल करण्यात आलेत. आत्तापर्यंत इन्स्टाग्राम किंवा फेसबुकवर पोस्ट केल्या जाणाऱ्या स्टोरीज‌नां चोवीस तासांची मर्यादा होती, पण आता इन्स्टाग्रामच्या लेटेस्ट अपडेटनंतर पोस्ट केल्या जाणाऱ्या स्टोरीज या वेगळ्या प्राइव्हेट स्पेसमध्ये सेव्ह होणार आहेत. हे अपडेट अँड्रॉइड आणि iOS साठी उपलब्ध आहे.

ऑटो सेव्ह होणार इन्स्टाग्राम स्टोरी

अर्चिव(संग्रहीत केल्या) प्रमाणे इन्स्टाग्राम स्टोरीज अकाउंटच्या एका प्राइव्हेट स्पेसमध्ये सेव्ह राहतील. खरं तर इन्स्टाग्राम हा असा सोशल स्पेस आहे जिथे यूजर्स आपल्या खाजगी जीवनाशी संबंधी काही अविस्मर्णीय क्षण शेअर करू शकतात पण चोवीस तासांची मर्यादा असल्याने स्टोरीज कायमच्या नाहीशा होतात, या समस्यांवर तोडगा म्हणून हे नवीन फिचर इन्स्टाग्राम घेऊन आलंय.

क्लाउडमध्ये सेव्ह होणार इन्स्टास्टोरी

या नवीन फिचरमुळे यूजर्सनां त्यांच्या आवडत्या स्टोरीज फोन मेमरीमध्ये सेव्ह करण्याची गरज लागणार नाही. ऑटोमॅटिक सेव्ह स्टोरी फीचरमुळे इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या सर्व स्टोरीज ऑटोमॅटिक क्लाउड स्पेसमध्ये सेव्ह होतील. जिथे यूजर्स ते फोटो आणि व्हिडिओ प्राइव्हेटमध्ये बघू शकतात आणि शेअरही करू शकतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 13, 2017 05:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...