S M L

आता फेसबूकवरही शोधा आयुष्याचा जोडीदार !

आयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठी आता तुम्हाला फेसबुकही मदत करणार आहे. फेसबुक लवकरच डेटिंग फीचर किंवा सेवा सुरू करणार आहे.

Renuka Dhaybar | Updated On: May 2, 2018 02:53 PM IST

आता फेसबूकवरही शोधा आयुष्याचा जोडीदार !

02 मे : आयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठी आता तुम्हाला फेसबुकही मदत करणार आहे. फेसबुक लवकरच डेटिंग फीचर किंवा सेवा सुरू करणार आहे. जगातील सर्वात मोठी सोशल मीडिया साईट यात नव्यानं उतरणार आहे.

सध्या टिंडरसारखे डेटिंग अॅप उपलब्ध आहेत. जोडीदार शोधण्यासाठी किंवा डेटिंगसाठी या अॅप्सना मिळणारा प्रतिसाद तुफान आहे. त्यामुळेच फेसबुकनं डेटिंग सेवेत उतरण्याचा निर्णय घेतलाय.

नुकतीच फेसबुकची वार्षिक परिषद पार पडली. यात मार्क्स झकरबर्गनं डेटिंग सेवा सुरु करण्याचा मानस बोलून दाखवला आहे. एका इंग्रजी वेबसाईटच्या माहितीनुसार युजर्सना फक्त डेटिंग अॅपद्वारे समोरच्या व्यक्तीशी चॅटिंग करता येणार आहे.

फेसबुकच्या सर्वेक्षणानुसार जवळपास २ अब्ज लोक हे एकटे आहेत तेव्हा त्यांच्यासाठी फेसबुकनं हे फीचर आणलं आहे. युजर्सच्या फेसबुक अकाऊंटहून फेसबुक डेटिंगचं अकाऊंट हे वेगळं असणार आहे. फेसबुक अकाऊंटवर असलेल्या युजर्सनां आपली मित्र किंवा मैत्रिण हे डेटिंग फीचर वापरत आहे याबद्दल कोणतीही माहिती मिळणार नाही.

डेडिंग अॅप वापरणाऱ्या युजर्सच्या गोपनीयतेची पुरेपुर काळजी ही सेवा देताना घेण्यात येईल असं सांगत फेसबुकनं युजर्सनां आश्वस्त केलं आहे. एका इंग्रजी वेबसाईटच्या माहितीनुसार युजर्सनां फक्त डेटिंग अॅपद्वारे समोरच्या व्यक्तीशी चॅटिंग करता येणार आहे. फेसबुकची डेटिंग सेवा टिंडर सारख्या डेटिंग अॅपची चांगलीच डोकेदुखी ठरणार असंही म्हटलं जात आहे.

Loading...
Loading...

सध्या डेटिंग सेवा पुरवणाऱ्या अॅपमध्ये टिंडर आघाडीवर आहे त्यामुळे टिंडरला फेसबुकमुळे मोठा प्रतिस्पर्धी येणाऱ्या काळात निर्माण होणार हे नक्की.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 2, 2018 02:53 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close