S M L

उंदिर घालवण्यासाठी नवीन मोबाईल अॅप!

आता चक्क मोबाईलद्वारे आपण घरातले उंदिर घालवू शकतो. विश्वास बसत नाही आहे पण असा अॅप खरंच बनवण्यात आला आहे.

Sachin Salve | Updated On: Jan 29, 2018 04:43 PM IST

उंदिर घालवण्यासाठी नवीन मोबाईल अॅप!

29 जानेवारी : घरातले उंदिर घालवण्यासाठी आपण घरात मांजर आणतो. पण आता त्याची काही गरज राहिलेली नाही. वाढत्या तंत्रज्ञानामुळे आणि वैज्ञानिक क्षेत्रातील तज्ञ्यांनी यावरही उपाय काढला आहे. आता चक्क मोबाईलद्वारे आपण घरातले उंदिर घालवू शकतो. विश्वास बसत नाही आहे पण असा अॅप खरंच बनवण्यात आला आहे.

आता मोबाईलचं असं अॅप आलं आहे ज्याने काही सेकंदातच तुम्ही घरातले उंदिर बाहेर पळून जातील. अॅन्टी-रॅट सोनार असं या अॅपचं नाव आहे. उंदरांना पळवण्यासाठी तुम्हाला हा अॅप मोबाईलमध्ये इन्स्टॉल करावा लागतो. गुगल प्ले स्टोरमधून तुम्ही हा अॅप मोफत डाऊनलोड करू शकता.

हा अॅप बनवणाऱ्यांचा असा दावा आहे की तब्बल 10 वर्षांच्या रिसर्चनंतर हा अॅप बनवण्यात आला आहे. हा अॅप सुरू केल्यानंतर त्यातून वेव्ह तयार होतात. ते एकताच उंदिर बाहेर येतात. जास्त आवाज असणाऱ्या ठिकाणी हा अॅप काम करणार नाही. जर तुम्ही या अॅपचा वापर करत असाल तर फ्रिक्वेंसी सेटिंग करून ठेवा. आणि नंतर या अॅपचा वापर करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 29, 2018 04:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close