S M L

मोटोचा G5 लाँच, किंमत फक्त 11,999 रुपये !

मोटो G5 चे फीचर्ससुद्धा तितकेच दमदार आहेत

Sachin Salve | Updated On: Apr 4, 2017 09:44 PM IST

मोटोचा G5 लाँच, किंमत फक्त 11,999 रुपये !

04 एप्रिल : मोटोने भारतीय मार्केटमध्ये आपला नवा स्मार्टफोन मोटो G5 लाँच केला आहे. याआधी  मोटो G5 हा स्मार्टफोन बार्सिलोनामध्ये झालेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2017(MWC) मध्ये लाँच केला होता. परंतु या गोष्टीचा भारतीय मार्केटमध्ये काहीसा फरक पडलेला दिसत नाहीये.

मोटो G5 चे फीचर्ससुद्धा तितकेच दमदार आहेत. या स्मार्टफोनला 5 इंचचा HD डिस्पले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 1.4GHz ऑक्टाकोर आणि स्नॅपड्रॅगन 430 या जबरदस्त अशा प्रोसेसर वर काम करतो. त्याचसोबत या फोनमध्ये  3GB रॅम आणि 16GB ची इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे.

कॅमेऱ्याबद्दल बोलायचं ठरलं तर, 13 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा सेल्फी फ्रंट कॅमेरा दिला आहे.मोटोरोची G5 ची संपुर्ण मेटल बॉडी डिझाईन केलेली असून, या स्मार्टफोनला कोरनिंग गोरिला ग्लास प्रोटेक्शन आणि फिंगरप्रिंट स्कॅनर असे दमदार फीचर्स आहेत. तसंच फोनमध्ये 2800 mAh ची बॅटरी असून, हा स्मार्टफोन अॅड्रॉईड नुगा 7.0 OS वर काम करेल.

कसा आहे मोटो G5

- डिसप्ले 5 इंच

Loading...

- रॅम 3GB, इंटरनल स्टोरेज 16GB

- प्रोसेसर 1.4GHz ऑक्टाकोर, स्नॅपड्रॅगन 430

- बॅटरी बॅकअप 2800 mAh

- अॅड्रॉईड नुगा 7.0 OS

- 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा फ्रन्ट कॅमेरा

- लाँचिंग किंमत 11,999 रु.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 4, 2017 09:44 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close