S M L

हवेत उडायला सज्ज व्हा, येतायत फ्लाइंग कार्स!

देशभरातल्या 19 पेक्षा जास्त कंपन्या फ्लाइंग कार बनवण्याच्या कामाला लागल्या आहेत. 2020पर्यंत या कार आपल्याला उडताना दिसणार असं सांगितलं जातंय.

Sonali Deshpande | Updated On: Nov 15, 2017 03:46 PM IST

हवेत उडायला सज्ज व्हा, येतायत फ्लाइंग कार्स!

15 नोव्हेंबर : तुम्हाला टारझन कार आठवते का? हो, तीच हवेत उडणारी कार. आता ती फक्त सिनेमात नाही तर प्रत्यक्षातही आली आहे. देशभरातल्या 19 पेक्षा जास्त कंपन्या फ्लाइंग कार बनवण्याच्या कामाला लागल्या आहेत. 2020 पर्यंत या कार आपल्याला उडताना दिसणार असं सांगितलं जातंय. या फ्लाइंग कारच्या प्रकल्पात गुगलचे संस्थापक लॅरी पेज यांची कंपनी किट्टी हॉक आणि युरोपची सगळ्यात मोठी जहाज बांधणी कंपनी एयरबस यांचा समावेश आहे.

काय आहेत या फ्लाइंग कारची वैशिष्ट्यं? 

- 2020 पर्यंत हवेत उडणाऱ्या या कारची आधीच बुकिंगही झाली आहेत.


- ही फ्लाइंग कार एरोमोबिलद्वारे बनवण्यात येणार आहे.

- ही फ्लाइंग कार दोन चाकी असणार आहे.

- गाडी चालू केल्यानंतर 3 मिनिटांमध्ये ती हवेत उडणार. तिची ड्राईविंग रेंज 700 किलोमीटर आणि हवेतली रेंज 750 किलोमीटर आहे.

Loading...

- जमिनीवर या गाडीचा वेग 160 किलोमीटर आहे आणि आकाशातला वेग 360 किलोमीटर इतका असणार आहे.

एयरबस या कंपनीने या कारचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामुळे या उडणाऱ्या कारची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागली आहे.

उबरनही फ्लाइंग कार लॉन्च करणार असल्याची घोषणा केली आहे. नासाच्या मदतीने ते कार बनवणार असल्याचं सांगितलं जातंय. त्यांची कार 'उबरएअर' या नावाने ओळखली जाईल.

चीन आणि जपानही फ्लाइंग कार बनवण्याच्या शर्यतीत आहेत.

भारतात कधी येणार फ्लाइंग कार?

- नेदरलॅण्डची कंपनी 'PAL-V'ने 2018पर्यंत भारतामध्ये फ्लाइंग कार लॉन्च करणार असल्याचा दावा केला आहे. यासाठी कंपनीने पेटंटही काढलं आहे.

-  या कंपनीने पहिल्यांदा 2013 मध्ये फ्लाइंग कारची चाचणी केली होती. त्यामुळे ती कधी एकदाची आपल्या हातात येते याचीच सगळे जण वाट बघतायत.

आता या फ्लाइंग कारमुळे रस्त्यावरची गर्दी कमी होते का? आणि या कारने आपल्या पर्यावरणाला तर काही धोका होणार नाही ना, हेच पाहणं महत्वाचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 15, 2017 03:45 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

But the job is not done yet!
vote for the deserving condidate
this year

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close