जिओची सरप्राईज आॅफर, मिळतोय 3300 रुपयांचा कॅशबॅक

जिओची सरप्राईज आॅफर, मिळतोय 3300 रुपयांचा कॅशबॅक

या ऑफरमध्ये 399चा रिचार्ज केल्यावर 3300 रुपयांचा बंपर कॅशबॅक मिळणार आहे.

  • Share this:

26 डिसेंबर : ख्रिसमस आणि नवीन वर्षाची सुरुवात होणार असल्यामुळे ऑफर्सचा पाऊस पडत आहे. अशीच हटके ऑफर 'जिओ'नंही दिली आहे. दोन दिवसांआधी रिलान्यस जिओनं आपल्या ग्राहकांसाठी 199 आणि 299 ची मंथली रिचार्ज ऑफर जाहीर केलीये. तसंच 25 डिसेंबरला जिओनं ग्राहकांसाठी 399ची 'सरप्राईज कॅशबॅक'ची ऑफर दिली आहे.

या ऑफरमध्ये 399चा रिचार्ज केल्यावर 3300 रुपयांचा बंपर कॅशबॅक मिळणार आहे. यात 400 रुपयांचं my-jio कॅशबॅक व्हाॅऊचर, वॉलेटमधून 300 रुपयांचा कॅशबॅक आणि ई-कॉमर्स प्लेअरमधून 2600 रुपये डिस्काऊंट मिळणार आहे. त्यामुळे तुम्हीही जर जिओग्राहक असाल तर या ऑफरचा नक्कीच फायदा घेई शकता.

या बरोबरच जिओ ग्राहकांसाठी नवीन वर्षाची बंपर ऑफर आणण्याच्याही तयारीत आहे. जिओच्या या नवीन प्लानचं नाव 'हॅप्पी न्यू ईयर 2018' असं असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 26, 2017 06:41 PM IST

ताज्या बातम्या