फक्त 3 क्लिकमध्ये होईल Jio 4G फोनचं प्री-बुकिंग !

फक्त 3 क्लिकमध्ये होईल Jio 4G फोनचं प्री-बुकिंग !

रिलायन्स ने 40 व्या एनुअल जनरल मीटिंग (AGM) मध्ये 4 जी जिओ फीचर फोन लाँच केला. या फोनची प्री-बुकिंग प्रोसेस सुरू झाली आहे.

  • Share this:

23 जुलै : रिलायन्स ने 40 व्या एनुअल जनरल मीटिंग (AGM) मध्ये 4 जी जिओ फीचर फोन लाँच केला. रिलायन्स कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी हा फोन फ्रीमध्ये देण्याची घोषणा केली. आॅगस्टपासून हा फोन भारतीय ग्राहकांच्या हातात दिसेल. या फोनची प्री-बुकिंग प्रोसेस सुरू झाली आहे.

प्री-बुकिंग प्रोसेस वेबसाईट

www.jio.com या वेबसाईटवर Jio 4G फोन प्री-बुकिंग होईल. जिओच्या या फिचर फोनसाठी तुमचे नाव, मोबाईल नंबर,ईमेल आईडी टाईप करताच तुमचे रजिस्ट्रेशन होईल.

रजिस्ट्रेशन प्रोसेस

स्टेप-1

-जिओच्या अधिकृत वेबसाईटवर www.jio.com  जा.

- होम पेजच्या,जिओ स्मार्टफोनच्या बॅनरवर Keep me posted वर क्लिक करा.  

स्टेप-2

- Keep me posted वर क्लिक करताच रजिस्ट्रेशन पेज येईल.

-नंतर तुमची माहिती द्या.

- फर्स्ट नेम

- लास्ट नेम

- फोन नंबर

स्टेप 3

-माहिती भरताच तुम्हाला रजिस्ट्रेशन कम्पलीट झालेला मॅसेज येईल.

-मॅसेज तुमच्या मोबाईल फोनवर येईल.

प्रत्येक आठवड्यात 50 लाख फोनचे सेट दुकानात उपलब्ध

जिओचा हा फिचर फोन 'पहले आओ-पहले पाओ' असा असेल. कंपनीकडून प्रत्येक आठवड्यात 50 लाख फोन विकण्यासाठी उपलब्ध असतील.या फोनमध्ये अल्फा न्यूमेरिक कीपॅड, 2.4 इंच QVGA डिस्प्ले, एफएम रेडिओ, टॉर्च लाईट, हेडफोन जॅक, एसडी कार्ड स्लॉट,फोर-वे नेविगेशन सिस्टम, फोन कॉन्टेक्ट, कॉल हिस्ट्री आणि जिओ अॅप सारखे फिचर्स आहेत.

लोकेशनद्वारे मॅसेज पाठवण्याची सुविधा

जिओ फोन फक्त स्मार्ट टीव्हीलाच नाही तर कोणत्याही जून्या CRT (कॅथोड रे ट्यूब) टीव्हीला कनेक्ट होईल. कनेक्ट होताच जिओ अॅपवर असलेला कन्टेंट टीव्ही स्क्रीनवर दिसेल. 5 नंबर बटणवर 'डिस्ट्रेस मॅसेज' पाठवण्याची सुविधा उपलब्ध आहे. या लोकेशनद्वारे इमरजेंसी मॅसेज रजिस्टर्ड कॉन्टेक्ट्सला पोहचेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 23, 2017 06:06 PM IST

ताज्या बातम्या