'जिओ'ची ग्राहकांना दिवाळी भेट, आज 'या' आॅफरवर 100% कॅशबॅक

या ऑफरचा फायदा घेण्यासाठी जिओच्या प्रिपेड कस्टमर्सना 12 ते 18 ऑक्टोबर दरम्यान 399 रुपयाचं रिचार्ज करावं लागणार आहे. पण हा प्लॅन 19 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 18, 2017 12:00 PM IST

'जिओ'ची ग्राहकांना दिवाळी भेट, आज 'या' आॅफरवर 100% कॅशबॅक

18 आॅक्टोबर : रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना खास दिवाळी भेट दिली. दिवाळी धन धना धन ऑफरमध्ये 100 % कॅशबॅक देण्यात येणार आहे. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी जिओच्या प्रिपेड कस्टमर्सना 12 ते 18 ऑक्टोबर दरम्यान 399 रुपयाचं रिचार्ज करावं लागणार आहे. पण हा प्लॅन 19 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.

काय आहे 100 % कॅशबॅक ऑफर ?

100% कॅशबॅक मिळणाऱ्या आॅफरसाठी ग्राहकांना जिओ अॅपमध्ये 50 रुपयांची 8 व्हाॅउचर मिळतील. म्हणजेच 399 रुपयांमध्ये 400 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. या व्हाॅउचर्सचा उपयोग 309 रुपयांच्या अधिकच्या रिचार्जवर तुम्ही करु शकणार आहात. जर तुम्हाला या व्हाॅउचर्सना डेटा अॅड ऑन रिचार्जमध्ये वापरायचं असेल तर त्यासाठी 99 रुपयांच्या अधिकच्या डेटा अॅन्ड ऑप्शन मध्ये निवडावं लागेल.

हा व्हाॅउचर्स 15 नोव्हेंबरच्या नंतरच तुम्ही वापरु शकता.

रिचार्ज कुठे करायचं ?

Loading...

प्रिपेड ग्राहकांनी 'जिओ दिवाली धना धन' ऑफरसाठी 399 रुपयांचं रिचार्ज जिओची वेबसाईट, जिओ अॅप, रिलायन्स डिजीटल आणि जियो स्टोर च्या माध्यमातून करू शकतात.

399 रुपयांत काय मिळणारेय ?

399 रुपयांत तीन महिन्यांचा दिवसाला 1 जीबीचा प्लॅन ग्राहकांना मिळेल. यामध्ये मोफत व्हाॅईस कॉलिंग,मोफत एसएमएस, रोमिंग आणि एसटीडी काॅल फ्री असेल. ही ऑफर ठराविक काळासाठीच उपलब्ध आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 18, 2017 12:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...