आता गुगल असिस्टंट करणार तुमची सर्व कामं!

आता गुगल असिस्टंट करणार तुमची सर्व कामं!

जगभरात लोक काय सर्च करतात, सर्च केल्यावर ते कशावर क्लिक करतात, काय बुक करतात, कोणते निर्णय घेतात, किती वेळात घेतात.. सगळं सगळं या असिस्टंटमध्ये रोजच्या रोज फीड होत असतं.

  • Share this:

अमेय चुंभळे, 12 मे : कुठला चित्रपट कुठे लागलाय, हे जाणून घेण्यासाठी आपण गुगल वापरतो. वीकेंडला कुठे जेवायला जायचं यासाठीही आपण ऑनलाईन सर्च करतो. पण तिकीट बुक करणं किंवा सीट रिझर्व करणंही जर आपल्या फोननं केलं तर ?

हा आवाज कोणत्या महिलेचा नाही, फोनचा आहे. गुगल असिस्टंट नावाच्या सॉफ्टवेअरनं खरंच एका हेअर सॅलोनमध्ये फोन लावला, आणि फोनच्या मालकासाठी अपाॅइंटमेंट घेतली. या गुगल असिस्टंटची पुढची पायरी गुगलनं कॅलिफोर्नियामधल्या वार्षिक कार्यक्रमात केली. गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनीच याचं प्रात्यक्षिक जगाला दाखवलं.

नजीकच्या भविष्यात तुमचा स्मार्टफोन अशा प्रकारची कामं करू शकेल.यामागे आहे सध्याचं आघाडीचं आणि बहुचर्चित तंज्ञत्रान. अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता. जगभरात लोक काय सर्च करतात, सर्च केल्यावर ते कशावर क्लिक करतात, काय बुक करतात, कोणते निर्णय घेतात, किती वेळात घेतात.. सगळं सगळं या असिस्टंटमध्ये रोजच्या रोज फीड होत असतं. गुगल सर्च, युट्यूब, गूगल मॅप्स या अ‌ॅप्समध्ये आपण काय शोधतो, ते सगळं साठवलं जात असतं. त्यावरून ट्रेंड्स तयार केले जातात. म्हणजे, विविध प्रवृत्ती सेव्ह केल्या जातात.

म्हणजे, कृत्रिम बुद्धिमत्तेत कित्येक लाखो टेराबाईट्सची माहिती सेव्ह असते.  गुगल असिस्टंट आता इतकं पुढे गेलंय की आपण बोलताना जसे पॉज घेतो, आवाजात बदल होतात, हेल निघतात.. हे सगळं हा असिस्टंट करतो. म्हणजे, त्याचा आवाज कोई मिल गया चित्रपटातल्या जादूसारखा वाटत नाही, मानवी आवाज वाटतो.

या उदाहरणामध्ये हेअर सॅलोनची अपॉईंटमेंट घेतली जातेय. गुगलनं यामध्ये फोनच्या बॅकग्राऊंडमध्ये काय केलं बघा. नेहमीच्या ब्युटी पार्लरचा नंबर शोधून काढला. स्वतःच फोन लावला. मंगळवारी सकाळी १० ते दुपारी १२ यावेळेत अपॉईंटमेंट हवीये, असं सांगितलं. मला एक सेकंद द्या, असं उत्तर आल्यावर अम्-हम्, असंही असिस्टंटनं म्हटलं!!! दुपारी सव्वाची वेळ नकोय, हेही अतिशय नम्रपणे सांगितलं. म्हणजे, यात सौजन्याची भावना आणि नम्रपणाचा गुण आला. याला कारणीभूत - कृत्रिम बुद्धीमत्ता. तिथून उत्तर आलं, सकाळी १०ची वेळ आहे. त्याला असिस्टंटनं होकार दिला. वेळ ठरली. हेअर सॅलोनमधल्या व्यक्तीला कळलंही नाही, की फोन गुगल असिस्टंटनं केला होता.

हे तंत्रज्ञान अजूनही पूर्णपणे तयार नाहीये. Development स्टेजमध्ये आहे. यामागचा हेतू एकच - वेळ आणि कष्ट वाचवणे. जगात आज अनेक अंतराळ अभियानं, ड्रायव्हरलेस कार्स, रोगांचं निदान, गुणांवरून कोणतं क्षेत्र निवडावं याचा सल्ला...अशा अनेक गोष्टींची उत्तरं कृत्रिम बुद्धिमत्तेतनं मिळतायेत. आणि अनेकदा ही उत्तरं माणसानं दिलेल्या उत्तरांपेक्षा सरस असतात, हे सर्वात महत्त्वाचं.

हेच मानवजातीचं भविष्य आहे, ही मात्र काळ्या दगडावरची रेघ. सॉफटवेअरच्या या बुद्धिमत्तेच्या जोडीला मन नाही, किंवा इंग्रजीत ज्याला conscious म्हणतात ते नाही..एवढाच काय तो फरक.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 12, 2018 01:05 PM IST

ताज्या बातम्या