तुम्ही गुगलने मराठीकरण केलेली नावं ऐकली का?

तुम्ही मुंबईकर असाल तर ईचीची बँक, वांद्रे दावा, ही नावे कधी ऐकली आहेत का? ऐकली नसतील तर तुम्ही गुगल मॅपला भेट द्या.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Dec 28, 2017 03:24 PM IST

तुम्ही गुगलने मराठीकरण केलेली नावं ऐकली का?

28 डिसेंबर : तुम्ही मुंबईकर असाल तर ईचीची बँक, वांद्रे दावा, ही नावे कधी ऐकली आहेत का? ऐकली नसतील तर तुम्ही गुगल मॅपला भेट द्या. आबालवृद्धांचा दिशादर्शक असलेल्या गुगल मॅपवर अनेक ठिकाणांचे मराठीकरण करीत असताना मराठीचा नकाशाच बदलला आहे. यामुळे गुगलचे मराठी पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

नकाशा प्रादेशिक भाषांमध्ये असावा अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती. यानुसार गुगलने नकाशाचे मराठीकरण करण्यास सुरुवात केली. परंतु गुगल भाषांतर सुविधेतील भाषाअज्ञानाचा फटका नकाशाचे मराठीकरण करताना बसला आहे.

गुगलचं मजेशीर मराठीकरण

आयसीआयसीआय बँक -  ईचीची बँक

घोडबंदर रोडवरील सिल्‍व्हर पाम लॉन्स - चांदी तळवे लॉन

Loading...

वांद्रे रेक्लमेशन - वांद्रे दावा

वांद्रे सी व्ह्यूचे - वांद्रे समुद्र पहा

अम्बापाडा - अम्बपदा

बेंगनवाडी - बैगांवादी

मंडाला - मनडाला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 28, 2017 03:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...