S M L

फेसबुकनं केलं डेटिंग फीचर लाँच!

फेसबुकच्या अॅपमध्येच डेटिंग फीचरचा पर्याय असणार आहे. त्यासाठी वेगळं प्रोफाईलही बनवता येणार आहे, तसंच तुमचे प्रेफरन्सेस सेट करता येणार आहेत.

Sonali Deshpande | Updated On: May 9, 2018 11:40 AM IST

फेसबुकनं केलं डेटिंग फीचर लाँच!

09 मे : अनेक दिवसांपासून ज्याची चर्चा होती, ते फेसबुक डेटिंग फीचर काल लाँच झालं.फेसबुकचा सीईओ मार्क झकरबर्ग यानं हे फीचर लाँच केलं. फेसबुकच्या अॅपमध्येच डेटिंग फीचरचा पर्याय असणार आहे. त्यासाठी वेगळं प्रोफाईलही बनवता येणार आहे, तसंच तुमचे प्रेफरन्सेस सेट करता येणार आहेत.

फेसबुकवर २० कोटी लोक सिंगल आहेत, आणि म्हणूनच त्यांच्यासाठी बरच काही करता येईल, असं आम्हाला वाटतं, असं झकरबर्ग म्हणाला.

सध्या टिंडरसारखे डेटिंग अॅप उपलब्ध आहेत. जोडीदार शोधण्यासाठी किंवा डेटिंगसाठी या अॅप्सना मिळणारा प्रतिसाद तुफान आहे. त्यामुळेच फेसबुकनं डेटिंग सेवेत उतरण्याचा निर्णय घेतलाय.

नुकतीच फेसबुकची वार्षिक परिषद पार पडली. यात मार्क्स झकरबर्गनं डेटिंग सेवा सुरु करण्याचा मानस बोलून दाखवला होता.  युजर्सना फक्त डेटिंग अॅपद्वारे समोरच्या व्यक्तीशी चॅटिंग करता येणार आहे.

काय आहेत वैशिष्ट्य?

Loading...
Loading...

- वेगळी प्रोफाईल बनवावी लागणार

- समोरच्याला नवी प्रोफाईलच दिसणार, नेहमीचं प्रोफाईल दिसणार नाही

- यासाठी वेगळी मेसेजिंग सर्विस असणार

- खास मेसेजिंग सर्विसवर फोटो शेअरिंग नाही

- अनेक ग्रुप्स, इव्हेंट्सला अनलोक करावं लागणार

- लोकेशन, आवडी-निवडी, ग्रुप्सच्या आधारावर डेट सुचवली जाणार

- स्वतंत्र अॅपचा सध्या तरी विचार नाही

- नव्या फीचरमध्ये जाहिराती नसणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 9, 2018 11:33 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close