50 कोटी मोबाईल नंबर बंद होण्याच्या बातमीत नवा ट्विस्ट

50 कोटी मोबाईल नंबर बंद होण्याच्या बातमीत नवा ट्विस्ट

डिपार्टमेंट आणि टेलिकम्युनिकेशन आणि यूआयडीएआय यांनी एकत्रिपणे याबाबत खुलासा केला आहे.

  • Share this:

मुंबई, 18 ऑक्टोबर : देशातील ५० कोटी मोबाईल नंबर बंद होणार असल्याची माहिती खोटी असल्याचा दावा यूआयडीएआय (UIDAI) कडून करण्यात आला आहे. डिपार्टमेंट आणि टेलिकम्युनिकेशन आणि यूआयडीएआय यांनी एकत्रिपणे याबाबत खुलासा केला आहे. त्यामुळे सिम कार्ड बंद होण्याच्या चिंतेत असणाऱ्या मोबाईल युजर्सना दिलासा मिळणार आहे.

काय होती बातमी?

ज्या ग्राहकांनी सिम कार्ड खरेदी करताना फक्त आधार कार्ड हेच ओळखपत्र म्हणून जमा केलं होतं, अशा ग्राहकांचं सिम कार्ड बंद होण्याची भीती होती. त्यामुळे देशभरातील मोबाईल युजर्स चिंतेत होते.

सिम कार्ड बंद होण्याची शक्यता का वर्तवण्यात आली होती?

काही दिवसांपूर्वीच सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय देत मोबाईल कंपन्या ग्राहकांच्या ‘केवायसी’ (know your customer) साठी आधारचा वापर करू शकत नाहीत, असा आदेश  दिला होता. कोर्टाच्या या निर्णयामुळेच मोबाईल कंपन्यांना ग्राहकांची आधारविषयक माहिती हटवावी लागेल.

Loading...

VIRAL VIDEO: 425 कोटींचे दागिने घालून या बायका खेळतायत गरबा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 18, 2018 12:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...