नोटबंदी एका वर्षानंतर, डिजीटल व्यवहारही मंदावला

नोटबंदी एका वर्षानंतर, डिजीटल व्यवहारही मंदावला

सुरुवातील लोकांनी डिजीटलचं स्वागत केलं. पण नोटबंदीच्या एकाच वर्षाच्या आतच डिजीटल पेमेंटची गती मंदावली आहे.

  • Share this:

08 नोव्हेंबर : नोटबंदी झाल्यानंतर सरकारने डिजीटल पेमेंट वाढवण्यावर खूप भर दिला. सुरुवातील लोकांनी डिजीटलचं स्वागत केलं. पण नोटबंदीच्या एकाच वर्षाच्या आतच डिजीटल पेमेंटची गती मंदावली आहे.

नोटबंदी झाल्यानंतर ऑनलाईन पेमेंटचा जणू ट्रेंडच आला होता. पण बाजारात डिजीटल ट्रांजॅक्शनची मंदी असल्याचं आता दिसून येत आहे. जेव्हा नोटबंदीची घोषणा झाली तेव्हा नोव्हेंबर 2016 मध्ये 94 लाख कोटी रुपयांचे डिजीटल व्यवहार होता. मार्च 2017 मध्ये इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टमद्वारे 149 लाख कोटी रुपयांचा व्यवहार झाला होता. मात्र त्यानंतर डिजीटल व्यवहाराकडे लोकांनी पाठ फिरवली.

डिजिटल व्यवसाय मंदावला

- नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)च्या आकडेवारीनुसार, जुलै 20017मध्ये डिजीटल व्यवसायांची रक्कम 107 लाख कोटी रुपये इतकी कमी झाली आहे. तर हीच रक्कम ऑगस्ट 2017मध्ये 109 लाख कोटी रुपये इतकी होती.

- डिजीटल पेमेंटचा आकडा सप्टेंबर 2017मध्ये 124 लाख कोटी रुपये इतका होता. पण तोच आकडा 29 ऑक्टोबरपर्यंत कमी होऊन 99.28 लाख कोटीवर येऊन पोहचला.

- डिजीटल पेमेंट वाढवण्यासाठी पॉईंट ऑफ सेल (POS) सारख्या मशिनींची संख्या वाढवण्यात आली पण तरी पण तरीही डिजीटल पेमेंटचं प्रमाण कमीच राहिलं.

मोबाईल वॉलेटच्या प्रमाणात ही पिछेहाट

- सुरुवातीला मोबाईल वॉलेटचा वापर करणाऱ्यांची संख्या खूप होती पण नंतर त्यालाही लोकांनी जास्त पसंती दिली नाही.

- रिजर्व्ह बँकेनुसार मोबाईल वॉलेटच्या ट्रांजॅकशनचं प्रमाण 9.95 कोटी आणि 3,385 कोटी रुपये होतं जे मार्च 2017ला 26.26 कोटी आणि 8,353 कोटी रुपयांनी वाढलं.

- ऑगस्ट 2017 मध्ये मोबाईल वॉलेटच्या ट्रांजॅकशनचं प्रमाण कमी होऊन 22.54 कोटी आणि 7,262 कोटी रुपये झालं.

- नोटबंदीनंतर पेटीएम, फ्रीचार्ज आणि मोबिक्विक सारख्या मनी वॉलेट्स कंपन्यांनी कॅब ऑपरेटर, भाजी विक्रेते आणि किराणा दुकाने यांना जोडून मोठ्या प्रमाणात मोबाईल वॉलेट ट्रांजॅकशनचा विस्तार केला.

- डिजिटाइजेशन करण्यावर बँकेचा पूर्ण जोर आहे. एसबीआयचे अध्यक्ष रजनीश कुमार म्हणाले की, "बँकेमध्ये आम्ही डिजीटल रूपांतर करीत आहोत आणि भविष्यात डिजिटालाइजेशनसाठी बँकांची तयारी करीत आहोत."

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2017 07:20 PM IST

ताज्या बातम्या