आयफोन 7 च्या 'RED' एडिशनच्या बुकिंगला आजपासून सुरूवात

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Mar 30, 2017 11:49 PM IST

आयफोन 7 च्या 'RED' एडिशनच्या बुकिंगला आजपासून सुरूवात

[wzslider autoplay="true"]

24 मार्च : जगविख्यात स्मार्टफोन निर्माती कंपनी अॅपलने नुकताच आपल्या आयफोन 7 सीरीजमधील नवा प्रोडक्ट 'RED' स्पेशल एडिशन लाँच केला आहे. हा नवा स्मार्टफोन लाल रंगाच्या रिअर बॉडीसोबत पाहायला मिळणार आहे. या स्पेशल लिमिटेड एडिशनच्या प्री बुकिंगला आजपासून सुरुवात होणार असून भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजल्यापासून ग्राहकांना या फोनचं बुकिंग करता येणार आहे. आयफोनने पहिल्यांदाच कंपनीचा ट्रेडिशनल कलर सोडून लाल रंगाचा स्मार्टफोन बाजारात आणला आहे.

याआधी आयफोन 7 लाँच करताना कंपनीने जेट ब्लॅक व्हेरिएंट आणला होता. त्याला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळालात आहे. त्यापाठोपाठ आता अॅपलने चक्क लाल रंगाचा आयफोन लाँच केला असून त्याला कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.  यापासून मिळणारा फायदा 'रेड' नावाच्या संस्थेला देण्यात येणार आहे. 'रेड' ही संस्था एड्सवरील उपचारावर संशोधन करण्याचं काम करते. अॅपल दरवर्षी 130 कोटी डॅालरचा निधी या ट्रस्टसाठी देते. त्यामुळेचे या स्मृतीप्रित्यर्थ अॅपने बाजारात लाल रंगाचा फोन आणला आहे.

आयफोन 7 आणि 7 प्लस लाल रंगातील 128 GB आणि 256GB मॉडेल उपलब्ध आहे. हा डिव्हाईस अॅपलच्या वेबसाईटवर 749 डॉलर एवढ्या किंमतीला उपलब्ध आहे. या नव्याची स्मार्टफोन विक्री अमेरिकेसह 40 देशात 24 मार्चपासून सुरू होईल.

आयफोन 7

Loading...

  • डिस्प्ले : 4.7 इंच
  • प्रोसेसर: A10 फ्यूजन
  • कॅमेरा : 7 मेगापिक्सल फ्रंट

    : 12 मेगापिक्सल रिअर कॅमेरा

  • रिझॉल्यूशन : 1920 x 1080  पिक्सल

दरम्यान, हा फोन अॅपल आणि REDच्या भागीदारीतील सर्वात मोठं प्रोडक्ट असल्याचं अॅपलचे सीईओ टीम कूक म्हणाले आहेत.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 24, 2017 11:51 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...