आला शाओमीचा रेडमी 4A, किंमत फक्त 5,999/-

आला शाओमीचा रेडमी 4A, किंमत फक्त 5,999/-

  • Share this:

[wzslider] 21 मार्च :  चीनी कंपनी शाओमीने आपल्या बजेटमध्ये बसेल असा आणखी एक स्मार्टफोन शाओमी रेडमी 4A भारतीय बाजारपेठेत लाँच केला. या मोबाईलची किंमत आहे फक्त 5,999रुपये.. फीचर्सच्या बाबतीत हा मोबाईल इतर स्मार्टफोनला टक्कर देऊ शकतो हे मात्र पाहण्याचं ठरणार आहे.

या मोबाईलचे फीचर्स बघितले तर यामध्ये 2GB रॅम आणि 16GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मेमरी देण्यात आली आहे. या मोबाईलच्या मेमरीला मायक्रो SD ने वाढवण्यात येऊ शकते.  मोबाईलचा रेज्युलेशन 1280 x 720P असून 5 इंचचा डिसप्ले आहे. रेडमी 4A, रिलाएंस जियो कम्पैटिबल 4G VoLTE सपोर्ट करू शकतो.

शाओमी रेडमी 4A अॅड्रॉईट 6.0 मार्शमेलोवर आधारित असून MIUI 8 इंटरफेसवर चालतो. शाओमीच्या या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर नाही आहे. परंतु बॅटरीच्या बाबतीत यामध्ये 3,120mAh असा तगडा बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे.

रेडमी 4Aचा प्रोसेसर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 425 वर काम करतो. मेटल बॉडी डिझाईन असलेल्या या स्मार्टफोन मध्ये LED फ्लॅश सोबत 13 मेगापिक्सल चा रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. त्याचप्रमाणे हा मोबाईल डार्क ग्रे, गोल्ड आणि रोज गोल्ड या कलर मध्ये उपलब्ध आहे.

 कसा आहे शाओमी रेडमी 4A ?

- डिसप्ले 5 इंच रेज्युलेशन 1280 x 720P

- रॅम 2GB, इंटरनल स्टोरेज 16GB

- बॅटरी बॅकअप 3,120mAh

- अॅड्रॉईट 6.0 मार्शमेलो

- LED फ्लॅश 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा

- कलर डार्क ग्रे, गोल्ड आणि रोज गोल्ड

- लाँचिंग किंमत 5,999 रु.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 21, 2017 07:40 PM IST

ताज्या बातम्या