S M L

पॅन कार्ड मिळणार मोबाईल अॅपद्वारे

Sonali Deshpande | Updated On: Mar 23, 2017 05:23 PM IST

पॅन कार्ड मिळणार मोबाईल अॅपद्वारे

16 फेब्रुवारी : डिजिटल इंडिया मोहिमेत आणखी एक पाऊल पुढे टाकत अॅपद्वारे पॅन कार्ड देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हे अॅप लवकरच लाँच करण्यात येणार आहे. याद्वारे पॅन कार्ड बनवण्यासाठी घरबसल्या अर्ज करता येईल.

आयकर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार हे काम अजूनही पहिल्या टप्प्यात सुरू आहे. वित्त मंत्रालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात या योजनेला सुरूवात होईल. यात आयकर विभागाकडून ई-केवायसीच्या आधारे अर्जदाराला पॅन नंबर त्वरित दिला जाईल.

आधार कार्ड योजनेला आणखी मजबूत करण्यासाठी पॅन कार्ड बनवताना आधार क्रमांक सक्तीचा करण्यात आला आहे. यामुळे अधिकाधिक जनता करवसुली क्षेत्रात येण्यास मदत होईल.

करदात्यांच्या तक्रारीचं ई-निवारण

Loading...
Loading...

करदात्यांच्या आयकरसंबंधी तक्रारींचं आता ई-निवारण करण्यात येईल. आयकर विभागाच्या 60 कार्यालयांतून करदात्यांच्या तक्रारी ऑनलाईन पद्धतीने सोडवण्यात येतील. लवकरच कार्यालयांची संख्या 100 करण्यात येणार आहे. एकूण 270 कार्यालये सुरू करण्याची योजना आहे.

आयकर संपर्क केंद्र म्हणजेच आस्क सेंटर या नावाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. करदात्याला आयकर विभागाच्या पोर्टलवर ई-निवारण या लिंकमध्ये तक्रार दाखल करता येईल. तसंच विभागाच्या कार्यालयात जाऊनही तक्रार नोंदवता येईल. तक्रारदाराला तक्रार क्रमांक देण्यात येईल. याद्वारे तक्रार निवारणाच्या प्रगतीवर लक्ष ठेवता येऊ शकतं.

दरवर्षी साधारण 2.5 कोटी लोक पॅन कार्डसाठी अर्ज करतात. तरीही देशात सध्या पॅन कार्ड धारक लोकसंख्या फक्त 25 कोटी आहे. ही संख्या वाढवण्याच्या दृष्टीने हे दोनही निर्णय घेण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 16, 2017 11:30 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close