व्हॉट्सअॅपला टक्कर देण्यासाठी आला गुगलचा अॅलो !

व्हॉट्सअॅपला टक्कर देण्यासाठी आला गुगलचा अॅलो !

  • Share this:

[wzslider]जीटॉक आणि गुगल हॅँगआऊटनंतर गुगलने आपले नवीन ऍप स्पर्धेत उतरवले आहे. 'Allo' या नवीन ऍपची टक्कर आता सरळ व्हॉट्सऍपशी होणार आहे. हा ऍप अत्याधुनिक आणि नवीन फिचर्सने पुरेपुर भरलेला आहे ऍलो पुर्वीपासून वापरात असलेल्या इतर व्हॉट्सऍप,फेसबुक,व्ही-चॅट,लाइन या प्रसिद्ध मेसेजिंग ऍप्सपेक्षा खूप वेगळा आहे.

'गुगल असिस्टंट' हे फिचर तर त्याचा युएसपी ठरतो. आपण यावर प्रसिद्ध ठिकाणे,हॉटेल्स,रेस्टॉरंट्स ,मल्टिप्लेक्स,मॉल्स शोधु शकतो. इतकंच नाही तर, आपल्या इतर गुगल अकाऊंट्सना सिंक केल्यानंतर हा ऍप आपल्या खूप जास्त उपयोगी पडतो.उदा.ड्राईव्हवर सेव्ह असलेले फोटोज् आपण एका मेसेजवर मिळवू शकतो.आपल्याला संपुर्ण फोटो गॅलरी शोधुन काढायची गरज भासत नाही. मात्र याचा माईनस पॉईंट हा की आपण कोणत्याही व्यक्तीसोबत अथवा ग्रुपमध्ये कनव्हर्सेशन करु शकत नाही.

कदाचित येत्या काळात गुगल त्यावरही पर्याय उपलब्ध करुन आपल्याला ही सेवासुद्धा देऊ करेल. त्याचसोबत आपण आपल्या मित्रांना हा ऍप डाउनलोड करण्यासाठी फ्री मेसेजद्वारे लिंक पाठवु शकतो. ही लिंक समोरची व्यक्ती इग्नोरसुद्धा करु शकते किंवा त्याला रिप्लायही देऊ शकते.

ऍलो अकाऊंट ओपन करणेसुद्धा सोपे आहे.प्लेस्टोअरमधून हे ऍप डाऊनलोड केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरची विचारणी होते. त्या नंबरवर आलेल्या व्हेरिफिकेशन कोडद्वारे अकाऊंट व्हेरिफाय होते. नंतर फ्रंट कॅमेरा ऑन करुन आपला सेल्फी मागितला जातो,जो आपला प्रोफाईल पिक्चर बनतो. अशाप्रकारे आपण आपलं ऍलो अकाऊंट तयार करु शकतो. ह्या अकाऊंटला आपण आपल्या गुगल अकाऊंटशी सिंक करू शकतो आणि त्याचा जास्त चांगला वापर करू शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2016 09:53 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...