फेक पोस्ट रोखण्यासाठी व्हाॅटस्अॅपचं नवीन फिचर

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 8, 2018 10:26 PM IST

फेक पोस्ट रोखण्यासाठी व्हाॅटस्अॅपचं नवीन फिचर

08 जून : व्हाॅटसअॅपने आता फेक न्यूज शेअर करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी कंबर कसली आहे. व्हाॅटस्अॅपने एक नवीन फिचर लाँच केलंय.

व्हाॅटसअॅपवर सर्रास काहीही शेअर केलं जातंय. त्यामुळे आता ज्या कुणी पोस्ट शेअर केली असेल त्याच्यावर फाॅरवर्ड असं नाव या पोस्टसह दिसणार आहे. हे कुणी कोणत्या फाॅरमॅटमध्ये पाठवलं हे सुद्धा दिसणार आहे.

अँड्राईडच्या  बिटा व्हर्जन 2.18.179 या अपडेटमध्ये हे फिचर तुम्हाला वापरता येईल. पण जर कुणी एखादी पोस्ट काॅपी करून पोस्ट केली तर त्यावर फाॅरवर्ड असं दिसणार नाही. म्हणजे जे फाॅरवर्ड मॅसेज पाठवले जातील त्या मॅसेजवरच फाॅरवर्ड हे लिहून येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 8, 2018 10:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...