News18 Lokmat

फेसबुकवरून डेटा चोरणारी कंपनी केंब्रिज अॅनालिटिका लवकरच होणार बंद

फेसबुक डेटा चोरी प्रकरणातली मुख्य आरोपी कंपनी केंब्रिज अॅनालिटिका लवकरच बंद होणार आहे. कंपनीनं अधिकृतरित्या दिवाळखोरी जाहीर केलीये.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: May 3, 2018 09:51 AM IST

फेसबुकवरून डेटा चोरणारी कंपनी केंब्रिज अॅनालिटिका लवकरच होणार बंद

03 मे : फेसबुक डेटा चोरी प्रकरणातली मुख्य आरोपी कंपनी केंब्रिज अॅनालिटिका लवकरच बंद होणार आहे. कंपनीनं अधिकृतरित्या दिवाळखोरी जाहीर केलीये. कंपनी बंद झाल्यावरही आम्ही तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करत राहू, असं कंपनीनं म्हटलंय.

डेटा चोरी प्रकरणामुळे कंपनीची बदनामी झाली. आणि त्यामुळे आम्हाला ग्राहक मिळत नाहीयेत, असा कांगावा करायलाही कंपनीनं सुरुवात केली आहे. कंपनीने जाहीर केले आहे की, आम्ही स्वतःला अमेरिका आणि ब्रिटनमध्ये दिवाळखोरीच्या रूपात जाहीर करणार आहोत.

केंब्रिज अॅनालिटिकावर राजकीय ग्राहकांच्या हितासाठी फेसबुक वापरकर्त्यांकडून चुकीची माहिती गोळा केली असल्याचा आरोप आहे. अमेरिकेचे अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचाही त्यांनी प्रयत्न केला होता.

दरम्यान, फेबसुकच्या प्रवकत्याकडून सांगण्यात आलं की, 'हा निर्णय डेटा लिक प्रकरणाचा आहे. त्यामुळे कंपनीचे कामकाज बंद होणं हे ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचं आहे. ग्राहकांच्या विश्वासावर आणि आमच्या कामकाजावर याचा मोठा परिणाम होणार आहे.'

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 3, 2018 09:51 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...