#yogi

Showing of 27 - 40 from 109 results
भाजप खासदाराने आपल्याच पक्षाच्या आमदाराला बुटाने बडवले, VIDEO व्हायरल

देशMar 6, 2019

भाजप खासदाराने आपल्याच पक्षाच्या आमदाराला बुटाने बडवले, VIDEO व्हायरल

06 मार्च : उत्तर प्रदेशमधील गोरखपूर इथल्या संतकबीरनगर जिल्हा परिषदेच्या बैठकीमध्ये योगी सरकारचे प्रभारी मंत्री आशुतोष टंडन यांच्यासमोरच खासदाराने आमदाराला बुटाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या बैठकीत मेहदावलचे आमदार राकेश सिंह यांना खासदार शरद त्रिपाठी यांनी सर्वांसमोर बुटाने मारहाण केली. जेव्हा ही घटना घडली तेव्हा प्रभारी मंत्री उपस्थितीत होते. एका स्थानिक कामाचे श्रेय घेण्यावरून हा वाद झाला होता. ज्या कामाचे भूमिपूजन झाले त्याच्या शिलान्यासावर खासदार शरद त्रिपाठींचे नाव नव्हते. त्यामुळे नाराज झालेल्या खासदारांनी आपल्याच पक्षाच्या आमदाराला बुटाने मारहाण केली. त्यानंतर आमदार राकेश सिंह यांचे समर्थक आक्रमक झाले आणि बदला घेतल्याशिवाय खासदार त्रिपाठी यांना सोडणार नाही असा पवित्रा घेतला. त्यामुळे खासदारांना जिल्हाधिकाऱ्यांच्या रूममध्ये बंद करावे लागले होते. पक्षानेही या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल मागवला आहे.