Home » Tag » Yoga Day » photogallery

yoga day फोटो - Yoga Day Photos

    21 जून International Yoga Day  म्हणून साजरा केला जातो. 2015 पासून या दिवसाला सुरुवात झाली. भौगोलिक दृष्ट्या 21 जून हा उत्तर गोलार्धात सर्वांत मोठा दिवस असतो. या दिवशी भारतीय योगासनांचं महत्त्व जगापर्यंत पोहोचवण्यासाठी तो दिवस योग दिवस असावा, असा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या UN मध्ये केलेल्या भाषणात दिला. तो मंजूर करण्यात आला आणि त्या वेळपासून जगभरात 21 जून हा जागतिक योग दिवस किंवा International Yoga Day म्हणून साजरा होता.

    केवळ भारतीयच नव्हे तर जगभरातले लोक या दिवशी योगासनांचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी योगसाधना करतात. संपूर्ण शरीराच्या आणि मनाच्या आरोग्यासाठी योगासनांसारखा उत्तम उपाय नाही, हे भारतीयांनी जगाला पटवून दिलं आहे. त्यामुळे योगसाधनेचे वेगवेगळे प्रकार जगभरात यापूर्वीच प्रचलित झालेले आहेत.

    भारतात आंतरराष्ट्रीय योग दिवसापूर्वीचा एक आठवडा योग सप्ताह किंवा Yoga Week म्हणून साजरा होतो. आरोग्याविषयी जागरुक असलेला प्रत्येक जण या दिवसात योगसाधना करतो. सूर्यनमस्कार, प्राणायम यापासून ते साध्या सोप्या आसनांपर्यंत काहीही सोपे योगोपचार सर्व वयोगटातल्या व्यक्तींना करता येतात.