#workers

Showing of 40 - 53 from 196 results
VIDEO : पोलिसांकडून NSUI च्या कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण; मोदींना दाखवले काळे झेंडे

व्हिडिओJan 9, 2019

VIDEO : पोलिसांकडून NSUI च्या कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण; मोदींना दाखवले काळे झेंडे

सोलापूर, 9 जानेवारी : ''चौकीदार चोर है..'', असं म्हणत कॉंग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाहनाचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलीसांनी NSUIच्या कार्यकर्त्यांना चक्क लाथा बुक्क्यांनी मारहाण करत ताब्यात घेतलं. पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी मंगळवारपासूनच कडकोट सुरक्षा यंत्रणा तैनात केली होती. आंदोलन करण्याची शक्‍यता असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांसह शहरातील शेकडो कार्यकर्त्यांना पोलीसांनी नोटीस बजावली होती. त्यानंतरसुद्धा NSUIच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षा भेदत ''चौकीदार चोर है'', अशा घोषणा देत मोदींचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी NSUIच्या कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण केल्याचं पाहायला मिळालं. हा सर्व प्रकार सोलापूस येथील न्यूज18 लोकमतचे प्रतिनिधी सागर सुरोशे यांनी कॅमेऱ्यात कैद केलाय...

Live TV

News18 Lokmat
close