तुम्ही जर फोनवर PUBG गेम खेळत असाल तर तुम्हाला सावध राहण्याची आवशक्यता आहे. या गेममुळे तुम्हाला मानसिक आजार होऊ शकतो. लोकांमध्ये या गेमची फार क्रेज आहे. जिथे नेटफ्लिक्स सारख्या व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर लोक 45 मिनिटांची वेबसीरीज पाहायला लोक कंटाळा करतात तिथे PUBG सारखा गेम लोक तासंतास खेळातात. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार हा गेम खेळण्याच्या सवईला मानसिक आजार असं म्हंटलं आहे. बंगळुरूच्या वेल्लोर इस्टीट्युट ऑफ टेक्नोलॉजीने हॉस्टेलमध्ये PUBG खेळण्यावर बॅन लावण्यात आला आहे. जसं जसं गेम खेळण्याचं प्रमाण वाढत आहे तसं तसं रुग्णांची संख्या वाढत आहे.