आपल्या फॅशनवरुन चर्चेमध्ये राहणारी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच घटनांवर आपले मत व्यक्त करणारी मीना हॅरीसची ओळख फक्त अमेरिकेच्या उपाध्यक्षा (Vice President of US) कमला हॅरीस (Kamala Harris) यांच्या कुटुंबातील व्यक्ती म्हणून नाही. भारतातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या परदेशी सेलिब्रिटींच्या यादीमध्ये मीना हॅरीसचे नाव येते. याच मीना हॅरीसबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.