Water Issue

Water Issue - All Results

Showing of 1 - 14 from 45 results
VIDEO: धक्कादायक! नळाच्या पाण्यातून आली पक्षाची पिसं

मुंबईJul 23, 2019

VIDEO: धक्कादायक! नळाच्या पाण्यातून आली पक्षाची पिसं

ठाणे, 23 जुलै: आधीच पाणी टंचाई असल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत आणि त्यातही ठाणे महापालिकेपासून एक ते दीड किमीच्या अंतरावरच्या नागरिकांना पिण्यायोग्य पाणीही मिळत नाही. ज्ञानेश्वर नगरपरिसरात नागरिकांना तब्बल चार महिन्यांपासून गढूळ पाणी प्यावं लागतं आहे. धक्कादायक म्हणजे या गढूळ पाण्यामुळे इथल्या तब्बल 70 टक्के नागरिकांना जुलाब, उलट्या, तापासारखे आजार झालेत. हे पाणी पिण्याच्याच नाही तर अंघोळीच्या लायकीचं नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे. कारण या पाण्यामुळे अंगाला खाज येते. प्रशासन पाणी प्रश्नाकडे लक्ष देत नसल्यानं नागरिकांकडून रोष व्यक्त केला जातो आहे. दुसरीकडे आसनगाव भागात नळातल्या पाण्यातून चक्क पक्ष्याची पिसं येत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला. शनिवारी संभाजीनगर विभागात सोडण्यात आलेल्या नळाच्या पाण्यात घाण आणि पिसं आली. या धक्कादायक प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय.