#vishwa hindu parishad

VIDEO : विहिंपच्या यात्रेत मिरवल्या तलवारी आणि एअर रायफल

व्हिडिओJun 3, 2019

VIDEO : विहिंपच्या यात्रेत मिरवल्या तलवारी आणि एअर रायफल

पिंपरी चिंचवड, 03 जून : विश्व हिंदू परिषदेच्या शोभा यात्रेदरम्यान शाळकरी मुलींच्या हातात तलवारी आणि एअर रायफल आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. विनापरवाना काढलेल्या या शोभायात्रेवर पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. यमुनानगर इथल्या अंकुश चौक ते ठाकरे मैदानादरम्यान दुर्गा वाहिनीची ही शोभा यात्रा काढल्यात आली होती. तेव्हा 4 मुली हातात तलवार आणि एअर रायफल घेऊन आढळल्या. यावेळी रायफलचा ट्रीगर दाबल्याने मोठा आवाजही झाला. या प्रकरणी विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष शरद इनामदार, जिल्हा कार्याध्यक्ष धनाजी शिंदे, जिल्हा मंत्री नितीन वाटकर आणि 200 ते 250 कार्यकर्त्यांचा गुन्ह्यात समावेश आहे.

Live TV

News18 Lokmat
close