नागपूर, 07 ऑगस्ट: नागपुरातील मद्यधुंद पोलिसाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या पोलिसाने मात्र सर्व नियम धाब्यावर बसवल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमुळे नागपूर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. मद्यधुंद अवस्थेत दुचाकीवरून जाताना पोलीस कर्मचारी रस्त्यावर पडला.दरम्यान या व्हिडिओची सध्या नागपूर पोलीस दलाकडून चौकशी सुरू आहे. त्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.